झूम : ऐटबाज ‘कॉन्टिनेंटल जीटी-६५०’

दुचाकी वाहनांत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या रॉयल एनफिल्ड कंपनीने बदलत्या जमान्यातही नव्या पिढीशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरला आहे.
continental gt 650
continental gt 650sakal
Updated on

दुचाकी वाहनांत शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या रॉयल एनफिल्ड कंपनीने बदलत्या जमान्यातही नव्या पिढीशी सुसंगत राहण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरला आहे. वजनदार आणि दणकट कॉन्टिनेंटल जीटी ६५० ही याच परंपरेला साजेशी आहे. चार प्रकारात आणि सात रंगात असलेली व्हिंटेज लूकची कॉन्टिनेंटल कॅफे रेसर आहे. जबरदस्त पिकअप आणि वेग हे या गाडीची खासियत.

विशेष म्हणजे रॉयल एनफिल्डच्या कॉन्टिनेंटल जीटी-६५० आणि इंटरसेप्टर ६५० या ट्‌विन्स बाईकचे भारतीय बाजारात एकाचवेळी आगमन झाले. या गाड्यांची एकमेकांशी स्पर्धा असून अन्य कोणत्याही कंपनीचे वाहन या गाड्यांशी स्पर्धा करेल, असे वाटत नाही. अन्य कंपन्यांच्या गाड्यांचा विचार केल्यास मर्यादित रंगातच गाड्या उपलब्ध आहेत.

कॉन्टिनेंटलचे इंजिन एसओएचसीसह ६४६ सीसीचे फोर स्ट्रोक आणि एअर कूल्ड आहे. या गाडीचे ट्विन इंजिन ७२५० आरपीएमला ४७.४५ पीएसची कमाल उर्जा आणि ५१५० आरपीएमला ५२.३ एनएमचे टॉर्क जनरेट करते. ट्रान्स्मिशनसाठी ६ स्पीड गिअरबॉक्स आहेत. जीटी-६५० ही अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायरसह ग्राहकाच्या सेवेत आहे. यापूर्वी वायर स्पोक व्हील मॉडेलसह उपलब्ध असायचे.

दृश्‍यरूपात कॉन्टिनेंटल मागील श्रेणीप्रमाणेच सादर केली असून, त्यात गोलाकार एलईडी हेडलाईट, स्वीचगिअर, ट्विन पॉड इन्स्ट्रमेंट क्लस्टर, ‘क्लिन ऑन स्टाइल’ हँडलबार आणि दोन एक्झॉस्ट आहेत. हॅलोजन युनिटऐवजी एलईडी हेडलाईटचा वापर करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये सुपर मेटीऑर-६५० शैलीचे स्वीच असून टेललॅम्प मात्र हॅलोजन श्रेणीतीलच आहे.

कॉन्टिनेंटलची वैशिष्ट्ये

चालविण्याचा अनुभव...

दमदार इंजिनमुळे गाडीचा पिकअप भन्नाट आहे. काही सेकंदांत शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठणाऱ्या जीटी कॉन्टिनेंटलचे सस्पेन्शन चालकाला सुखद अनुभव देते. अचानक एखादे जनावर आडवे आल्यास जागेवर थांबण्याची किमया जीटीमध्ये आहे. वेगाने जाणाऱ्या जीटीला जागेवर थांबविणारी डिस्क ब्रेक प्रणाली सक्षम आहे. महामार्ग किंवा मोकळ्या रस्त्यावरून वेगात जाताना प्रसंगी चारचाकी वाहनांही मागे टाकते. कमाल वेग १४० किलोमीटर प्रतितासापर्यंत गाठू शकते. एखादा खड्डा आला, तरी सस्पेंन्शन चांगले असल्याने चालकाला आणि सहकाऱ्याला धक्का फारसा बसत नाही. गतिरोधकही आरामात पार करते.

१) ‘कॉन्टिनेंटल जीटी ६५०’साठी कंपनीने दोन ब्लॅक आउट श्रेणी आणल्या आहेत. यात स्लिपस्ट्रिम ब्लू आणि ॲपेक्स ग्रेचा समावेश आहे. आरामदायी वाटणारी आसनरचना आणि स्वीचगिअरजवळ यूएसबी चार्जिंग पोर्ट आहे.

२) ‘कॉन्टिनेंटल जीटी’मध्ये नवीन ब्लॅक आउट व्हेरियंटमध्ये ब्लॅक आउट इंजिन आणि एक्झॉर्ट पार्ट्स आहेत. त्यामुळे बाईकचा लूक आणखीच आकर्षक.

३) पेट्रोल टाकीची क्षमता १२.५ लिटर एवढी आहे. तब्बल २११ किलो वजनाच्या आणि बीएस-६ इंजिनच्या जीटीचा ग्राउंड क्लिरन्स १७४ एमएम आहे.

४) जीटीचे नवीन यूएसबी पोर्ट यूजर फ्रेंडली असून तो मोबाईल कमी वेळात चार्ज करतो.

५) जीटीचे सर्व फिचर अपडेट आहेत. इंजिन केसिंग, इंजिन हेड, ड्यूअल एक्झॉस्ट पाइप, मिरर, फ्रंट फोर्क आणि हँडलबार काळ्या रंगात आहेत. जीटी ब्लॅक रे आणि बार्सिलोना ब्लू या रंगात उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.