झूम... : रुबाबदार इंटरसेप्टर-६५०

‘रॉयल एन्फिल्ड इंटरसेप्टर-६५०’ ही वजनदार कॅफे रेसर बाईक. आकर्षक लूक आणि रुबाबात धावणारी इंटरसेप्टर चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
royal enfield interceptor 650
royal enfield interceptor 650sakal
Updated on

‘रॉयल एन्फिल्ड इंटरसेप्टर-६५०’ ही वजनदार कॅफे रेसर बाईक. आकर्षक लूक आणि रुबाबात धावणारी इंटरसेप्टर चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ६४८ सीसीची दणकट इंटरसेप्टर एलईडी हेडलाईट, एलईडी डीआरएल, कस्टम ग्राफिक्समुळे आणखीच लक्षवेधी ठरते. ८०४ मिलिमीटरची आसनाची उंची ही रायडरला आरामदायी राहणारी आहे.

एका अर्थाने ‘इंटरसेप्टर ६५०’ ही जपानची सामुराई तलवारीसारखीच ‘कातिल’ दिसते. शक्तिशाली पॅरेलल ट्विन इंजिन गाडीचा भारदस्तपणा वाढवतो. एअर कूल्ड इंजिन ५२५० आरपीएमला ५२ एनएमचे टॉर्क जनरेट करते. ७१५० आरपीएमला कमाल ४७ बीएचपीचे शक्ती निर्माण करते. सिक्स स्पीड गिअरबॉक्स हे रस्त्यावरील अन्य वाहनांना मागे टाकण्याचे काम करते.

मजबूत डबल क्रेडल फ्रेम, सस्पेन्शन सेटअपमुळे आरामदायी प्रवास करता येतो. ट्विन गॅस चार्ज्ड ॲबॉझॉर्बड्, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन क्वाईल ओव्हर रियर शॉक्स हे गाडीचा समतोलपणा आणि स्पोर्टीनेस यात चांगले संतुलन राखतात. रस्त्यावरील खड्डे, तीव्र उतार किंवा चढ, घाटवळणाचा रस्ता लीलया रितीने पार करते. जबरदस्त इंजिन, आकर्षक लूक आणि दणकट ब्रँड असा त्रिवेणी संगम इंटरसेप्टरमध्ये दिसतो. देशात लॉंचिंगमध्येच यशस्वी ठरणाऱ्या निवडक बाईकमध्ये इंटरसेप्टरचा समावेश होतो.

वैशिष्ट्ये

  • ‘इंटरसेप्टर ६५०’ चार श्रेणींत आणि ११ रंगांत उपलब्ध आहे.

  • बीएस ६ इंजिन असलेल्या इंटरसेप्टरला मागे आणि पुढे डिस्क ब्रेक आहे. बाईकला ॲटी लॉकिंग ब्रेकिंग सुविधा आहे.

  • गाडीचे वजन २१३ किलो असून इंधनटाकीची क्षमता १३. ७ लिटर आहे.

  • इंटरसेप्टर ही भारतात सात रंगात ब्लॅक, ब्लू, पर्ल, रेड विथ ब्लॅक, ग्रीन, रेड आणि क्रोममध्ये आहे.

  • अलॉय व्हिल्स, ट्विन एक्झॉस्ट, आरामदायी आसनरचना.

  • गोल हेडलाइट, लांब क्रॉमेड एक्झॉस्ट, ट्रिपर नेव्हीगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सर्पोटेड सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट.

  • एलईडी हेडलाईट, अपडेटेड स्वीचगिअर आणि जीपीएस सुविधा.

  • कमाल वेग १६५ किलोमीटर प्रती तास असून, ग्राउंड क्लिअरन्स १७४ मिलिमीटर.

चालविण्याचा अनुभव

अन्य दुचाकी वाहनांच्या तुलनेत रॉयल एन्फिल्डच्या गाड्यांचा अनुभव दमदार आणि आरामदायी राहतो. गर्दीत आणि कमी जागेतही वाट काढताना चालकाला थोडेही असुरक्षित वाटत नाही. इंटरसेप्टरचे खास वैशिष्ट्य म्हणजे मिरर. दोन्ही आरशांतून मागच्या वाहनाची स्थिती अचूक रीतीने दिसते. सस्पेन्शनला तोड नाही.

गर्दीमुळे रस्त्याच्या खाली उतरण्याची वेळ आली, तरी पुन्हा रस्त्यावर येताना चालकाला फारसा त्रास होत नाही. ती पुन्हा रस्त्यावर येत वाऱ्याशी स्पर्धा करते. यावेळी तिच्या वजनाची थोडीही भीती वाटत नाही.इंटरसेप्टरचा पिकअप कॉन्टिनेंटलच्या तुलनेत थोडा कमी जाणवत असला, तरी ती पाच ते दहा सेंकदादरम्यान शंभर किलोमीटर प्रतितास वेग गाठते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.