Ashadh Amavasya 2024 : दीप अमावस्येला दिव्यांची करावी लागते पूजा, काळे कुळकुळीत झालेले दिवे असे करा चकचकीत!

Home remedies for clean brass diya : देवघरातील देव सुद्धा पितळेचे असतात. तर काही जुन्या घरात पितळेची भांडी सुद्धा वापरली जातात. पण ही पितळेची वस्तू स्वच्छ करणे मोठ्या कष्टाचे काम आहे.
Ashadh Amavasya 2024
Ashadh Amavasya 2024esakal
Updated on

Home remedies for clean brass diya :

आषाढी अमावस्येला घराघरात दिव्यांचे पूजा केली जाते. संपूर्ण घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून जाते. काही लोक घराबाहेर मातीचे दिवे लावतात. तर काही लोक देवघरात पितळेच्या दिव्यांची पूजा करतात.

उद्या आषाढी अमावस्या असल्याने आजच घराघरात पितळेचे दिवे स्वच्छ करण्याचे मोहीम सुरू असेल. अमावस्येच्या सायंकाळी ही पूजा केली जाते त्यामुळे तुम्ही जर दिवे चकचकीत करण्याची मेहनत करत असाल. तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

Ashadh Amavasya 2024
Copper Water Drinking: उन्हाळ्यातही तांब्याचे पाणी पिणे योग्य आहे का?

पूर्वापार आपण दिवे हे पितळेचे वापरत आलो आहोत. आपल्या देवघरातील देव सुद्धा पितळेचे असतात. तर काही जुन्या घरात पितळेची भांडी सुद्धा वापरली जातात. पण ही पितळेची वस्तू स्वच्छ करणे मोठ्या कष्टाचे काम आहे. कारण पितळ लगेचच काळ पडतं. त्यामुळे काळे कुळकुळीत झालेले दिवे केवळ वरचेवर साफ करून स्वच्छ होणार नाहीत.

आषाढी अमावस्येला दीप अमावस्याच देखील म्हणतात. त्यामुळेच यंदाच्या दीप अमावस्येला तुम्ही दिव्यांची पूजा करणारा असाल, तर ते दिवस स्वच्छ कसे करायचे याच्या काही सोप्या ट्रिक्स आपण जाणून घेऊयात.  

Ashadh Amavasya 2024
Utensils Cleaning Tips: कितीही घासली तरी काळीच पडतात? या मॅजिक ट्रिकने चमकवा तांब्या पितळेची भांडी

बेकिंग सोडा

पितळेचे दिवस स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबूचा वापर करू शकता. लिंबूचा रस आणि सो बेकिंग सोडायची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही पितळेच्या दिव्यांवरती लावा. आणि काही वेळानंतर गरम पाण्याने दिवस स्वच्छ करा. त्यामुळे पितळेचे दिवे चकचके दिसायला लागतील.

व्हिनेगर

पितळेचे दिवे चमकवण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा सुद्धा वापर करू शकता. तुम्ही व्हिनेगर थेट पितळी दिव्यांवरती लावून त्याने स्वच्छ करू शकता. तसेच याची दुसरी पद्धत म्हणजे व्हिनेगर दिव्यांवर ते लावून ठेवा आणि थोड्या वेळानंतर मिठाने घासून हे दिवे चमकवा.

Ashadh Amavasya 2024
Ashadh Amavasya : दीप अमावस्येला मुलांचे औक्षण करणं असतं शुभ, पण कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे?

मिठाचा वापर करा

मीठ आणि लिंबू तुमच्या घरातील अनेक गोष्टी स्वच्छ करण्यात मदत करतात. मीठ आणि लिंबाचा वापर करून तुम्ही तेलकट झालेला किचन ओटा, फरशी सुद्धा साफ करू शकता. हा प्रयोग तुम्ही तुमच्या पितळी दिव्यांवर सुद्धा करू शकता. यासाठी एक चमचा मीठ घेऊन त्यामध्ये लिंबाचा रस घाला, आणि तयार झालेली पेस्ट दिव्यांवरती लावा. आता हे मिश्रण दिव्यांवरती लावून घासा. यानंतर गरम पाण्याने धुऊन घ्या. यामुळे दिवे चमकायला लागतील.

Ashadh Amavasya 2024
Vastu Tips : पितळेचे भांडे घरातील बंद खोलीत असणे अशुभ, येईल आर्थिक संकट

चिंचेचा वापर करा

पितळेची भांडी किंवा दिवे चमकवण्यासाठी तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी आंबट चिंच पाण्यात भिजत ठेवा आणि थोड्या वेळानंतर चिंचेची पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट स्क्रबवर घेऊन तुम्ही याने दिवस स्वच्छ करा. या प्रयोगाने ही तुमची दिवे नव्यासारखे चमकायला लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.