Ashadhi Ekadashi 2023 : सध्या सर्वत्र विठोबाचा गजर सुरू झालाय. विठूमाऊलीच्या नामघोषात संत तुकोबा अन् संत ज्ञानेश्वरांच्या पालखी पंढरपुराकडे मार्गस्थ झाली आहे. पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो. याबरोबरच देवळाचा 'लहान माडू’ उल्लेखही नंतरच्या काही शीलालेखांमध्ये पाहायला मिळतो.
या मंदिरात एक घटना अशी घडली होती. की ज्याचे आश्चर्य आजही केले जाते. तुम्हाला माहितीय का की एक वेळ अशी आली होती की, पंढरपुरात पांडुरंगच नव्हता. तो कर्नाटकात गेला होता. त्यामागची स्टोरी काय आहे हे आज पाहुयात.
कर्नाटकात असलेलं हंपी हे शहर तुम्हाला माहिती असेलच. हंपी हे कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक छोटेसे शहर आहे. हे शहर तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हंपी प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. हंपी येथील श्विरुपाक्ष मंदिर म्हणजेच विठ्ठलाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
१४व्या शतकात हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.[४] हे एक तटबंदी असलेले शहर आहे. पर्शियन आणि युरोपियन प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीजांनी लिहिलेल्या इतिहासवृत्तात असे म्हटले आहे की हंपी हे तुंगभद्रा नदीजवळचे एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होते.
ज्यामध्ये असंख्य मंदिरे, शेती आणि व्यापारी बाजार होते. इ.स. १५०० पर्यंत, हंपी-विजयनगर हे मध्ययुगीन काळातील बीजिंग नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर होते आणि कदाचित त्यावेळेस भारतातील सर्वात श्रीमंत शहर होते.
उभ्या महाराष्ट्राचे आवडते दैवत विठू माऊली मंदिर रुपाने पंढरपुरात आहे. पण या विठूरायासाठी कर्नाटकातील हंपी या शहरात 15 व्या शतकात कृष्ण देव राय यांनी भव्य मंदिर उभारले.
या मंदिरालाच विजया विठ्ठल मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हंपी येथे असलेल्या सर्व ऐतिहासिक वास्तूत विजया विठ्ठल मंदिर सर्वांग सुंदर आहे. या मंदिरात असलेल्या ५६ दगडी स्तंभावर जर हाताने थाप मारली तर सुमधुर ध्वनी निर्माण होतो.
या स्तंभाच्या आत काही धातू असून त्याद्वारे संगीतमय ध्वनी निर्माण होतो असे इंग्रजांना वाटले. त्यामुळे त्यांनी दोन स्तंभ पाडले. परंतु स्तंभाच्या आत असे काही आढळले नाही. हे दोन तोडलेले स्तंभ आजही तेथे आढळतात. विजया विठ्ठल मंदिराच्या बाहेर एक दगडी रथ आहे. या रथाचे चित्र पन्नास रुपयांच्या नोटेवर आहे.
एका आख्यायिकेनुसार स्वप्नात विठ्ठलाने त्यांना दृष्टांत दिला आणि मूर्तीला पुन्हा पंढरपूररात प्रतिस्थापित करण्याचा आदेश दिला. नाराज झालेल्या कृष्णदेव राय यांनी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही. आजही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या प्रतिक्षेत हे मंदिर उभे आहे.
विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम द्रविडी शैलीतले आहे. मंदिराच्या चहूबाजूंना उंच तटबंधी आहे. त्यामध्ये एक मुख्य मंदिर आणि आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेकडून प्रवेश करताच आपण वेगळ्या जगात तर नाही ना आहोत, असा भास होतो.
या मंदिराचाही एक इतिहास आहे. या मंदिराची कहाणी नेमकी काय ते आपण या भागात पाहुयात. पंढरपूरच्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्ण देवराय यांनी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बाधंले.
'पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ति हंपी येथे आणून इथल्या रथामध्ये तिची स्थापन केली होती. साक्षात विठ्ठलाने सम्राट कृष्ण देवरायांच्या स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि ती मूर्ती पुन्हा पंढरपूररात ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे नाराज झालेल्या कृष्णदेवरायानी पुन्हा या मंदिरात विठ्ठल मूर्ति स्थापन केली नाही.', अशी या मंदिराची अख्यायिका आहे.
असंही सांगितले जाते की, पंढरपूरच्या विठ्ठलासाठी विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवरायांनी हंपी येथे जगप्रसिद्ध विठ्ठल मंदिर बांधले. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ति हंपीला घेऊन कृष्णदेवराय आला, इकडे पंढरीत आषाढी एकादशीला वारकरी जमा झाले. ज्याच्या दर्शनासाठी आपण येथे आलो.
तो विठ्ठल त्याच्या जागेवर नाही हे कळल्यानंतर सर्वांच्या विनंतीवरून संत एकनाथ महाराजांचे पणजोबा श्री संत भानुदास महाराज यानी आपल्या भक्तीसामर्थ्याने श्रीविठ्ठल मूर्ती पंढरीत परत आणुन त्याची पुनर्स्थापना केली. तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा.
पांडुरंगरायाची रथातून मिरवणूक काढुन संत भानुदासमहाराजांच्या हस्ते त्याची पुनर्स्थापना करण्यात आली. ही घटना आहे इ. स. १५०७ ची! त्याची आठवण म्हणुनच आजही कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे परंपरेने रथ मिरवणूक काढण्यात येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.