Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंच्या 'या' प्रमुख मंदिरांना नक्की द्या भेट

Ashadhi Ekadashi 2024 : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण हे विठ्ठलमय झाले आहे.
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024esakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024 : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण हे विठ्ठलमय झाले आहे. कारण, आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांची पावले आता पंढरपुरकडे वळली आहेत.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी वारीची अनोखी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. यंदा ही आषाढी एकादशी १७ जुलैला (बुधवारी) साजरी केली जाणार आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून ही ओळखले जाते.

हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा, विष्णू महेश यांची गणना त्रिमूर्तीमध्ये केली जाते. या त्रिमूर्तींपैकी महेश म्हणजेच शंकर यांची देशात १२ ज्योतिर्लिंगे आहेत, जी खूप प्रसिद्ध आहेत. ब्रह्मदेवाचे देशात एकमेव मंदिर आहे.

परंतु, भगवान विष्णूंच्या प्रमुख मंदिरांबद्दल तुम्हाला माहित आहे का? विठ्ठल म्हणजे भगवान विष्णूंचे एक रूप आहे. आज आपण आषाढी एकादशीच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भगवान विष्णूंच्या काही प्रमुख मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024: यंदा आषाढी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्व

जगन्नाथ मंदिर

ओडिशा राज्यातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर हे देशातील चार प्रमुख धामांपैकी एक आहे. या मंदिरात भगवान विष्णू हे कृष्ण अवतारामध्ये आहेत. त्यांच्या या रूपाला भगवान जगन्नाथ म्हणून त्या ठिकाणी ओळखले जाते.

त्यांच्यासोबत श्रीकृष्णांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या देखील मूर्ती या मंदिरात स्थापित करण्यात आल्या आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा ही देशभरात प्रसिद्ध आहे.

पंढरपुरचे विठ्ठल मंदिर

महाराष्ट्रातील सोलापुर जिल्ह्यात पंढरपुरमध्ये स्थित असलेले विठ्ठल मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे. हे विठ्ठलाचे  मंदिर भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्णाला समर्पित आहे. या मंदिरात विठुरायासोबतच त्यांची पत्नी रूक्मिणी यांची देखील मूर्ती स्थित आहे.

आषाढी एकादशीला पंढरपुरात वैष्णवांचा मेळा जमतो. या दिवशी महाराष्ट्रातून वारकऱ्यांची पायी चालत आलेली वारी पंढरपुरात पोहोचते आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होते. वारीचा फार मोठा इतिहास महाराष्ट्राला लाभला आहे. ही प्राचीन परंपरा आज ही तितक्याच प्रेमाने आणि भक्तीभावाने जपली जाते.

तिरूपती बालाजी मंदिर

आंध्रप्रदेश राज्यात स्थित असलेले तिरूपती बालाजी मंदिर हे सर्वांनाच माहित आहे. हे मंदिर दक्षिण भारतातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक आहे. या ठिकाणी श्री हरी व्यंकटेश्वर स्वामी हे भगवान तिरूपतीच्या (विष्णूंच्या) रूपात स्थित आहेत. त्यांची भव्य मूर्ती या मंदिरात स्थित आहे.

बद्रीनाथ मंदिर (उत्तराखंड)

उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणून ओळखले जाते. या राज्यात स्थित असलेले बद्रीनाथ मंदिर हे देशातील चार धामांपैकी एक आहे. भगवान विष्णूला समर्पित असलेले हे बद्रीनाथ मंदिर अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर आहे. हे मंदिर आठव्या शतकात बांधण्यात आले असून, मंदिरात शालिग्राम खडकाची बद्रीनाथांची मूर्ती बसवण्यात आली आहे.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Wari 2024 : भारताच्या पहिल्या गावातही आहे विठ्ठल रखुमाईचे मंदिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.