आज आषाढी एकादशी आहे. लाखो भक्त पंढरपुरात दाखल झाले आहे. वैष्णवांचा मेळाच पंढरीत अवतरला आहे. पंढरी नगरीत आज भक्तांनी चंद्रभागा नदीत स्नान केले. गावा-गावात असणाऱ्या विठ्ठल मंदिरातही उत्साहाचे वातावरण आहे.
आजच्या या खास निमित्ताने आपण श्री विठ्ठलाची अनेक रूपे जाणून घेत आहेत. विठ्ठलाची एक खास मूर्ती आहिल्या नगर या जिल्ह्यात आहे. पूर्वीच्या अहमदनगर आणि सध्याच्या अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात एका मंदिरात विठ्ठलाची खास मूर्ती आहे. या मंदिरातील मूर्तीला मिशा कोरलेल्या असून त्याचे डोळेही चांदीचे बसवण्यात आले आहेत. आज आपण या मंदिराचे आणि मूर्तीची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊयात.
अहिल्यानगरमध्ये नेवाशापासून अवघ्या बारा मैलांवर असलेले टाकळीभान हे श्रीविठ्ठलाचे एक ठिकाण आहे. या ठिकाणी गावच्या मध्यभागी टेकाडावर असलेल्या 'मंदिरातील चतुर्भुज श्रीविठ्ठल भान राजाचे कुलदैवत होते अशी दंतकथा आहे,' अशी माहिती इतिहास संशोधक सांगतात.
१९७७ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, हे विठ्ठलमंदिर 'यादवकालीन असून टाकळीभानमध्ये यादवपूर्वकालीन अनेक मंदिरांचे शिल्पखंड आढळतात,' असेही इतिहास संशोधक म्हणतात.
टाकळीभानची आणि तेथील विठ्ठलाच्या मंदिराची प्राचीनता इतकी मागे जात असेल, तर विठ्ठलमूर्तिविचारांतच नव्हे, तर विठ्ठलस्वरूपाच्या घडणीच्या विचारांतही या ठाण्यातल्या चतुर्भुज मूर्तीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरेल, असे वाटते.
स्थानिक परंपरेत ज्याची स्मृती अभंग राखली गेली आहे आणि ज्याचे नाव टाकळीशी कायमचे जोडले गेले आहे, तो हा 'भानू' नामक राजा, टाकळीतील पुरातन अवशेषांचा विचार करता, यादवकालीन असेल काय? श्री. जोशी सांगतात की, श्रीविठ्ठल हे त्याचे कुलदैवत होते.
मूर्तीला आहेत मिशा अन् डोळे
टाकळीभानच्या चतुर्भज विठ्ठलमूर्तीबाबत कोणत्याही शिल्पकला संप्रदायातील शिल्पवैशिष्ट्यापेक्षा स्थानिक शिल्प-वैशिष्ट्याची छाप अधिक वाटते. ही विष्णुस्वरूप विठ्ठलमूती असूनही तिला मिश्या कोरलेल्या आहेत. चांदीचे डोळे बसविले आहेत आणि तिचे सौष्ठव हे अभिजात मूर्तिशिल्पाचे नसून अस्सल लोकशिल्पाचे आहे, हे ध्यानी घेता तिच्या संपूर्ण घडणीत देवाच्या मूळ प्रकृतिधर्माचा आविष्कार घडला आहे.
मूर्तीवर आहे अखंड शिवलिंग
मूर्तीच्या सौंदर्यापेक्षा तिचे चार हात आणि आणि मस्तकावर स्पष्ट दृग्गोचर होईल. अशा प्रकारे कोरलेले शाळुंकेसह शिवलिंग या तिच्या दोन अनन्यसाधारण विशेषांचे विशेष महत्त्व आहे. श्रीविठ्ठल हा कोणत्याही पांरपरिक मूर्तिलक्षणग्रंथाचा विषय झालेलाच नाही. याची अभ्यासकांना स्पष्ट कल्पना आहे.
टाकळीभानच्या या चतुर्भुज विठ्ठलमूर्तीसह ज्या जुन्या-नव्या ज्ञात विठ्ठलमूर्ती आहेत. त्यांचा विचार करता असे दिसते की, श्रीविठ्ठलाचे ध्यान कधी द्विभुज विष्णुरूपात, कधी चतुर्भुज विष्णुरूपात, कधी गोपाळकृष्णाच्या रूपात भक्तांनी घडविले आहे.
(संबंधित माहिती आणि फोटो रा.चिं.ढेरे यांच्या श्री विठ्ठल एक महासमन्वय या पूस्तकातून घेण्यात आली आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.