Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठल अवतार घेण्यासाठी श्री विष्णूंनी पंढरीचीच निवड का केली? पांडुरंगमहात्म्यात सांगितली आहेत ही चार कारणं!

Why did Lord Vishnu choose Pandhari to incarnate Vitthal : स्कंद 'पांडुरंगमाहात्म्या'त श्रीविठ्ठलाच्या प्रकटनाच्या काही घटना नोंदवल्या गेल्या आहेत
Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashiesakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024 :

भगवान विष्णूंचे अनेक अवतार आहेत. असं सांगितलं जात की त्यांनी आजवर २४ अवतार घेतले. त्यापैकी १० प्रमुख अवतार आहेत. श्री विष्णूंच्या अवतारांपैकी एक असलेला श्री विठ्ठलांचा आता उत्सव सोहळा सुरू आहे. सर्व वारकरी चालत पंढरपुरात पोहोचले आहेत.

भगवान विठ्ठलांचा अवतार घेण्यासाठी श्री विष्णूंनी पंढरीनगरीचीच निवड का केली, याबद्दल पांडुरंगमहात्म्यात काही कारणं सांगितली आहेत. आज आषाढी एकादशी विशेष लेखांमध्ये आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.

Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi 2024 : लग्नाची वरात टाळ, वीणा, भजनाच्या साथीने; वारकरी संप्रदायाची जपली परंपरा..

स्कंद 'पांडुरंगमाहात्म्या'त श्रीविठ्ठलाच्या प्रकटनाची ही घटना जशी नोंदविली आहे. 'पांडुरंगमाहात्म्या'त विठ्ठलाचे चरित्र ग्रथित झाले आहे.

पहिलं कारण – दिंडीर वन

डिंडीरव (दिंडीर) वनात मातलेल्या डिंडीरव नामक दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप धारण केले आणि लोहदंडाने त्या दैत्याचा वध केला.

Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi 2024 : उपवासाला होतोय पित्ताचा त्रास? खा हे पौष्टिक पदार्थ अन् पहा चमत्कार

दुसरं कारण – रूसलेल्या रुक्मिणीला मनवण्यासाठी

कृष्णाने द्वारकेतही राधेला जवळीक दिल्यामुळे त्याच्यावर रुसून भीमेच्या काठी दिंडीरवनात येऊन राहिलेल्या रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी कृष्ण गाई- गोपाळांसह प्रथम गोपाळपूर या ठिकाणी आला आणि तेथे सर्व परिवार ठेवून एकटाच गोपवेषाने रूक्मिणीकडे गेला.

तिसरं कारण - भक्त पुंडलिकासाठी

भक्त पुंडलिकासाठी उभा राहिली विठेवरी, अशी वाक्य तुम्ही ओव्यांमध्ये, विठ्ठलाच्या गाण्यांमध्ये ऐकली असतील. त्याच प्रमाणे, भक्त पुंडलिकाच्या मातृ-पितृ सेवेवर प्रसन्न होऊन आशिर्वाद दिले. पुंडरिकाच्या (पुंडलिकाच्या) मातृपितृसेवेने संतुष्ट होऊन त्याच्या आश्रमात कृष्ण गोपवेषाने त्याला दर्शन देण्यासाठी आला.

Ashadhi Ekadashi
चिपळूण आगारातून वारीसाठी जादा गाड्या

चौथे कारण - एका गोपीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन

पद्मा नामक एका रूपसुंदर युवतीने इष्टवरप्राप्तीसाठी तप आरंभिले असता देव तिच्याहूनही सुंदर रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाला. स्कांद माहात्म्या- नुसार ही एक अनाम गोपी होती; तर पाद्य माहात्म्यानुसार ती चंद्रसेन राजाची कन्या होती. देवाच्या वरप्रदानामुळे तिच्च्या नावाने 'मुक्तकेशी' तीर्थ निर्माण झाले.

(संबंधित माहिती लेखक रा.चिं.ढेरे यांच्या 'श्री विठ्ठल : एक महासमन्वय' यांच्या पुस्तकातून घेण्यात आली आहे. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.