Ashadhi Ekadashi 2024 : पुरातन विठ्ठलाची मुर्ती वाचवण्यासाठी निंबाळकरांनी केला गनिमी कावा, मंदिर पाहून तुम्हीही फसाल

Solapur Viththal Temple : स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी निंबाळकर घराण्याची फार मोठी भुमिका होती. निंबाळकरांनी या मंदिराचेही रक्षण केले आहे.
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024esakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2024 :

या जगाच्या निर्मितीपासूनच आपल्या देशात अनेक मंदिरे आहेत. काही मंदिरे आजही तशीच आहेत. तर काहींची तोडफोड झाली आहे. विशेषत: मुघलांनी जेव्हा भारतावर आक्रमण केले. त्याकाळात अनेक हिंदू मंदिरांची तोडफोड झाली.

मराहाष्ट्रातील अनेक मंदिरातही हे घडले. तुळजापूरची जगदंबा देखील मुघली आक्रमणापासून दूर राहीली नाही. मुघलांच्या याच कृतीवर सोलापुरातील निंबाळकरांनी गनिमी कावा केला होता.

सोलापुरातील माढे गावात एक विठ्ठल मंदिर आहे. हे मंदिर प्राचिन असल्याचे सांगितले जाते. या मंदिरावर मुघलांची नजर पडू नये यासाठी निंबाळकरांनी केलेली शक्कल आपल्याला आजही फसवते. ती नक्की काय गोष्ट आहे हे पाहुयात.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Wari 2024 : दुमदुमली भूवैकुंठनगरी

या विठ्ठल मंदिरातील मूर्ती खास आहे. कारण, या मूर्तीच्या हृदयावर एक खास मंत्र कोरला आहे. तो काय आहे हे आधी जाणून घेऊयात.

पाद्य आणि स्कांद या दोन्ही 'पांडुरंगमाहात्म्यां'त श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य सांगितले आहे. हे वैशिष्ट्य एवढे अपवादभूत आहे की, आद्य मूर्तीची निश्चिती करण्यासाठी त्यासारखे दुसरे कोणतेच साधन असू शकणार नाही.

भारतात अनेक विठ्ठलाच्या मुर्ती आहेत. त्या मुर्तीची वैशिष्ट्येही आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रातील एका मंदिरात अशी विठ्ठलाची मूर्ती आहे जिच्या हृदयावर एक मंत्र कोरलेला आहे.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Wari 2024 : एक हात कमरेवर तर एक मोकळा; काय आहे विजयी पांडुरंगाची कथा!

या मूर्तीच्या हृदयावरच श्रीविठ्ठलाचा मंत्र कोरलेला आहे. माढे या गावी असलेल्या विठ्ठल मंदिरात ही मुर्ती आहे. भक्तभाविकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे.

काय आहे देवांच्या हृदयावर कोरलेला श्लोक

श्रीस्पर्शाद्यं सत्यनामाद्यं

षणषटू सदीर्घकं ॥ ष

टषटू दिनंत्यंतं स

सारं तं विदुर्बु

धाः ॥ श्री

वत्स

माढे मंदिरातील विठ्ठल मुर्तीच्या हृदयावरील श्लोक
माढे मंदिरातील विठ्ठल मुर्तीच्या हृदयावरील श्लोकesakal
Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi wari 2024 : बंधुभेटीच्या सोहळ्याने वैष्णव गहिवरले;पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

काय आहे या मंत्राचा अर्थ

या कूट श्लोकाचा अर्थ लावताना असे दिसते की, त्याचा शेवटचा चरण 'संसार तं विदुर्बुधाः' ('तो मंत्र रहस्यासह ज्ञानी जन जाणतात') असा आहे. हा चतुर्थ चरण वजा केल्यावर पहिल्या तीन चरणांतच मंत्ररहस्य साठवले आहे, हे स्पष्ट होते. यांपैकी अगदी पहिल्या चरणात कोरीव लेखात जो श्रीकार दिसतो आहे, तो मंगलार्थक आहे; देवाचे ऐश्वर्य, पूज्यत्व सूचित करणारा आहे.

मूळ मंत्रातील ते आद्याक्षर होय. श्रीकारानंतर 'स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं' असे दोन शब्द पहिल्या चरणात आहेत. 'स्पर्शाद्यं' म्हणजे स्पर्श वर्णांपैकी पहिला वर्ण. 'कादयो मान्ताः स्पर्शाः' ('क्' पासून 'म् 'पर्यंतचे वर्ण हे स्पर्श वर्ण होत) अर्थात् 'स्पर्शाद्यं' म्हणजे 'कू' हा वर्ण होय.

सोलापुरातील माढे येथील विठ्ठल मूर्ती
सोलापुरातील माढे येथील विठ्ठल मूर्तीesakal
Ashadhi Ekadashi 2024
Pandharpur Ashadhi Ekadashi Updates : आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखाहून अधिक वैष्णवांचा मेळा पंढरीत

काय आहे निंबाळकरांचा गनिमी कावा

देवळाच्या उंबरठ्याच्या कीर्तिमुखाच्या पायरीवर खालील ओळी आहेत :

राव माहादाजी निंबा

ळकर शेरणांगत पांडुरंग चेर

णीं

अर्थात् हे देऊळ महादजी निंबाळकराने बांधले."

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi: ...तेव्हा लालबहाद्दूर शास्त्री विठ्ठलाचं दर्शन न घेताचं परत गेले होते

निंबाळकर हे माढ्याचे जहागीरदार घराणे. रंभाजी निंबाळकराने बांधलेला जुना वाडा आजही माढ्यात पाहायला मिळतो. निंबाळकरांनी बांधलेल्या या विठ्ठलमंदिरातील मूर्तीच्या हृदयावरील लेख स्कांद 'पांडुरंगमाहात्म्या'तील कूट श्लोकाशी एकरूप आहे, याबाबत आता कोणालाही शंका उरणार नाही. जसे माहात्म्याच्या दोन हस्तलिखितांत पाठभेद आहेत.

मंदिर आहे एका दर्ग्यासारखे

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही विठ्ठलाच्या या खास मुर्तीच्या मंदिराचे बांधकाम हे बाहेरून एखाद्या मुस्लिम दर्ग्यासारखे आहे. प्रथम दर्शनी हे मंदिर नाहीतर दर्गा आहे असेच भासते. पण, आतमध्ये साक्षात विठूमाऊली विराजमान आहेत.

Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; यंदा नाशिकच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

या मंदिराचे बांधकाम निंबाळकर बंधूंनी केले आहे. त्यामागे त्यांचा हेतू असा होता की, या मंदिराकडे पाहून मुघली फौजा मंदिरावर हल्ला करणार नाहीत. कारण, यापूर्वी अफजल खान आणि इतर मुघल सेनापतींनी अनेक मंदिरांची मोडतोड केली आहे. त्यामुळेच, या विठ्ठल मंदिराचे बांधकाम अशापद्धतीने केले गेले आहे.

स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी निंबाळकर घराण्याची फार मोठी भुमिका होती. निंबाळकरांनी या मंदिराचेही रक्षण केले आहे.

(संबंधित माहिती 'श्री विठ्ठल एक महासमन्वय' या रा.चिं.ढेरे यांच्या पुस्तकातून घेण्यात आली आहे.)

माढे येथील विठ्ठल मंदिर
माढे येथील विठ्ठल मंदिरesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.