Ashadhi Wari 2023 : यंदा सोन्या अन् खासदार ओढणार संत तुकाराम महाराजांची पालखी!

संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मानाची बैलजोडी कशी निवडली जाते
Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 esakal
Updated on

Ashadhi Wari 2023 : जसं एखाद्या आंदोलनासाठी, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोकांचे जथ्थेच्या जथ्थे एकत्र येत असतात. तशाच प्रकारे महाराष्ट्रात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात गोळा होत असतात. आषाढी एकादशीनिमित्त वारकरी विठू माऊलीच्या पायावर डोक ठेवतात अन् धन्य होतात.

वारीत राज्याच्या कानकोपऱ्यातून वारकरी सहाभागी होतात. लाखोंच्या संख्येने वेगवेगळ्या भागातून वारकरी दिंड्यामधून पंढरपूरला येतात. यामुळे दिंड्यांच्या वाटेवरील गावांच्या अर्थकारणात भर पडते. आळंदी आणि देहू येथून येणाऱ्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यात लाखोने वारकरी येतात.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari : देहूनगरीतून आज होणार तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान, फुगड्या अन् भजनांमध्ये वारकरी दंग

यंदा संत तुकाराम महाराजांची पालखी ओढण्याचा मान खेड तालुक्यातील येरवडे गावातील मोरे कुटुंबियांना मिळाला आहे. गेली तीन वर्ष त्यांनी पालखीचा मान मिळावा म्हणून प्रयत्न केले होते. यंदा त्यांना हा मान मिळाला. बैलाची निवड ही, जोडी कशी आहे, त्यांची चाल, दुरवरील किती दिसू शकतं, त्यांची शिंगे आणि रूप पाहून या रूबाबदार जोडीची निवड करण्यात आली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मान जाधवांकडे

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रथापुढे चालणारे श्री संत श्रीपाद बाबा व रामदास बाबा यांच्या पायी वारीला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वीस लाख रुपये खर्च करून नवीन रथ बनविला आहे. रथासाठी लकी ड्रॉ काढून बैल जोडी शोधण्यात आली. याचा मान झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील श्‍यामराव नारायण जाधव यांच्या बैल जोडीला हा मान मिळाला आहे.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari : पालखी प्रस्थानाला मिळणार मर्यादित प्रवेश; प्रत्येक दिंडीत किती वारकऱ्यांना मिळणार संधी?

महाराजांची पालखी ओढणे हे खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते. यामध्ये एक कमिटी देखील काम करते कि जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देते.

या संपूर्ण सोहळ्यात एक डॉक्टरांची टीम देखील असते कि जी वेळोवेळी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या खिल्लार बैलांची आरोग्याची काळजी घेतात. तसेच जर बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर बैलांच्या पायाला पत्री मारणे देखील वेळोवेळी केले जाते.

विशेष बाब सांगायची झाली तर भारतीय गोवंश भरपूर आहेत, पण या पालखी सोहळ्यासाठी फक्त खिल्लार गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणारे खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari 2023 : आम्ही पंढरीचे वारकरी वारी चुको नेदी हरी..! दिंडीचे कापडणेत स्वागत

कशी होते बैलजोडीची निवड

तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतेही कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मानासाठी अर्ज भरू शकतात. यामध्ये रीतसर अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लार बैलांची निवड करतात.

दरवर्षी २ वेगवगेळ्या कुटुंबाला हा मान दिला जातो. दोन कुटुंबाला मान दिल्या मुळे याचा फायदा खिल्लार बैलांना असा होतो कि, पहिल्या दिवशी एका कुटुंबाची बैल पालखी रथ ओढतात आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुटुंबाची बैल रथ ओढतात, त्यामुळे पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळतो.

Ashadhi Wari 2023
Ashadhi Wari : पालखी सोहळ्यात कसलीही गैरसोय नको; मंत्री चव्हाणांचे प्रशासनाला आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()