Ashadhi Wari 2024 : आषाढी एकादशीला विठोबाचे दर्शन झाले नाही तर नाराज होऊ नका, या मंदिरात विठोबा नक्की भेटेल!

Takpithe Viththal Mandir : विठोबाने ताक पीठ खाण्याचा बालहट्ट केला अन् तो पंढरपुरातून दूर जाऊन बसला, वाचा ताकपीठे विठोबाची कथा!
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024esakal
Updated on

Ashadhi Wari 2024 :पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. त्याच विठोबाला पाहण्यासाठी दरवर्षी दोनवेळा भाविक पायी चालत पांडुरंगाच्या दर्शनाला जातात.

इतके दिवस चालल्यानंतरही मायबाप पांडुरंगाच्या चरणावर डोक टेकवण्याची संधी फार कमी वारकऱ्यांना मिळते. कारण, वारकऱ्यांची लांबच लांब दर्शनाची रांग पाहून अनेक वारकरी कळसाचे तर काही वारकरी मुख दर्शन घेऊन बाहेर पडतात.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Ekadashi 2022: विठोबाला कानडा का म्हटलं जातं?

त्यातील काही वारकरी पंढरपुरात असलेल्या दुसऱ्या एका मंदिरात विठोबाचं दर्शन घेतात. त्यामागे कारण असं की, या वेगळ्या मंदिरातही विठ्ठलाचीच मुर्ती आहे आणि आषाढी एकादशीला या मंदिरातही साक्षात पांडुरंग उपस्थित असतो असे सांगितले जाते. आज आपण त्याच मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते मंदिर पश्चिमद्वार रस्त्याला आहे. या मंदिराला ताकपिठे विठोबा मंदिर असेही ओळखले जाते. हे मंदिर मूळ विठ्ठल मंदिरापासून केवळ अडीचशे फुटांवर आहे. प्रमुख विठ्ठल मंदिरात असलेली मूर्ती आणि ताकपिठे विठोबा मंदिरात असलेली मूर्ती यात काही अंगाने साम्य आहे.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेत गर्दीमुळे ज्यांना विठोबाचे दर्शन होत नाही ते भाविक ताकपिठे विठोबाचे दर्शन घेतात कारण प्रमुख मंदिरातीलच विठ्ठल येथे ताकपीठ खाण्यासाठी आल्यामुळे हे दर्शनही त्याच विठोबाचे आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे मंदिर साध्या विटांमध्ये बांधले आहे. येथील नित्योपचारी व्यवस्था महाजन, बडवे यांच्याकडे आहे.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Ekadashi 2022: उपवास करताना 'या' पाच गोष्टींची काळजी तुम्ही घेता का?

श्रीविठ्ठल येथे येण्याविषयीची व सदरील नाव प्राप्त होण्याविषयीची अशी कथा सांगतात की, पूर्वी रमाबाई नामक एक स्त्री होत्या. त्यांचे गाव पैठण. त्या पांडुरंगाच्या भक्त होत्या. रमाबाईस पांडुरंगाचा साक्षात्कार झाला.

या पांडुरंगाला ताक भात आवडण्यामागची कथा

रमाबाई आपले गाव सोडून श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राहिल्या होत्या आणि रात्रंदिवस पांडुरंगाची सेवा करीत होत्या. या माताजींचा असा एक नियम होता की त्या ज्या काही पदार्थ बनवायच्या तो आधी पांडुरंगाला नैवेद्य दाखवायच्या आणि मगच स्वत: खायच्या. रमाबाईंचे ताक पीठ पांडुरंगाला आवडायचे.

तेव्हा देवाने स्वत:च रमाबाईंना सांगितले की, मला ताक पीठ आवडते. तेच मला रोज देत जा. तेव्हा रमाबाईंनी देवांना रोजच ताक पीठ अर्पण केले. पुढे जेव्हा रमाबाईं वृद्ध झाल्या तेव्हा त्यांना देवांच्या सेवेत रोज जाणे शक्य झाले नाही.

भगवंतास भोग होईना; त्यामुळे त्या स्वतः ही जेवत नसत. माताजींना उपवास होऊ लागला तेव्हा भक्तजनांविषयी परमदयाळू असे श्रीविठ्ठल दुसरे रूप धारण करून त्यांच्या भेटीसाठी गेले.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Ekadashi 2022 प्रतिपंढरी जमला वैष्णवांचा मेळा; विठ्ठलवाड़ीत दुमदुमणार हरी नामाचा गजर

प्रत्येक दिवशी बालहट्ट करत ते ताक पीठ मिटक्या मारीत खाऊ लागले. पुढे त्या माताजींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर प्रभू परत जाण्यास निघाले. तेव्हा रमाबाई भगवंतांना म्हणाल्या, "देवा तू येथेच राहा. मी पूर्वीप्रमाणे वारंवार देवालयात येऊ शकत नाही.

तू गेल्यास मी उपाशी राहून, प्राणत्याग करीन." अशा रीतीने अतिशय आग्रहामुळे श्रीविठ्ठल तेथेच राहिले आणि त्यांचे ताकपीठ प्रतिदिवशी खाऊ लागले.

या कारणाने हे ताक पीठ खाणारा विठोबा असे देवांचे वेगळे नाव झाले. भक्त म्हणतात की, अद्यापही भगवंत रुक्मिणीमातेसोबत तेथेच आहेत. भगवंतास ताक व पिठाचा भोग अर्पण केला असता, भगवंत सर्व पातकांपासून आपल्याला मुक्त करून अंती वैकुंठलोकास नेतात, अशी भाविकांमध्ये दृढ श्रद्धा आहे.

या मंदिराचे बांधकाम कधी झाले

या मंदिरात पाच ओळींचा एक शिलालेख आहे. 'श्रीविठ्ठलदेव रुक्मिणीवल्लभ शके १५४० काळयुक्त नाम संवत्सरे आस्वन सुध पाडिवा ओवरी संपूर्ण.' आधी येथील श्रीविठ्ठल हे तळघरातील गर्भगृहात होते. शिलालेख लिहिलेल्या ओवरीचे काम इ. स. १६१८ मध्ये पूर्ण झाले होते.

तेव्हा स्वत: देव आणि माता रूक्मिणीच रमाबाईंच्या भेटीला गेले तिथेच राहीले. तेच हे पांडुरंगाचे ताक पीठ मंदिर होय. 

Ashadhi Wari 2024
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त मनमाड आगारातर्फे रोज बसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.