Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीनिमित्त छोट्या वारकऱ्यांची अशी करा तयारी, फॉलो करा 'या 'सोप्या टिप्स

Ashadhi Wari 2024 : आषाढ महिन्याची चाहूल लागताच आपल्या सगळ्यांना वारीचे वेध लागतात.
Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 esakal
Updated on

Ashadhi Wari 2024 : आषाढ महिन्याची चाहूल लागताच आपल्या सगळ्यांना वारीचे वेध लागतात. या महिन्यातील आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये वैष्णवांचा अनोखा मेळा जमतो. या सगळ्या वारकऱ्यांना ओढ लागते ती म्हणजे पंढरपुरच्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची. त्यामुळे, ही आषाढी वारी ही महाराष्ट्राची केवळ परंपरा नाही तर एक अप्रतिम सोहळा आहे.

हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक वारकरी पंढरीच्या दिशेने चालू लागतो. परंतु, सगळ्यांनाच या वारीला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे, पांडुरंगाचे कित्येक भक्त संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी येतात. या वारकऱ्यांमध्ये छोट्या वारकऱ्यांचा ही समावेश असतो.

लहान मुले वारकऱ्यांचा पोशाख करून आवर्जून या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मग, छोट्या वारकऱ्यांची तयारी करताना पालकांनी कोणत्या टिप्स फॉलो करायच्या? चला तर मग जाणून घेऊयात.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 :  संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान; २५ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर कुऱ्हाडे कुटुबांच्या हौश्या अन् बाजीला मिळाला मान

मुलांसाठी खास वेशभूषा

आषाढी एकादशीनिमित्त मुले वारकऱ्यांची वेशभूषा करू शकतात. तसेच, शाळेतील कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, विठ्ठल यांच्यापैकी कोणाचीही वेशभूषा करू शकतात.

वारकरी वेशभूषा करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी :

  • पांढरे धोतर आणि बंडी

  • टोपी

  • तुळशीमाळ

  • टाळ

  • गंध

  • भगव्या पताका

इत्यादी गोष्टींची आवश्यकता भासेल. या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे वेशभूषा कऱण्यासाठी धोतर, बंडी, गंध, तुळशीमाळ, केशरी, सोवळे (माऊलींच्या वेशभूषेसाठी) पगडी, उपरणे, चिपळ्या, आणि वीणा इत्यादी गोष्टींची तयारी करावी लागेल. या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील, तुम्ही त्या खरेदी करू शकता.

विठ्ठलाप्रमाणे वेशभूषा साकारण्यासाठी उपरणे, सोवळे, मुकुट, पारंपारिक दागिने, गंध इत्यादी गोष्टींची आवश्यकता भासेल. यासाठी तुम्ही एकदा विठ्ठलाच्या मूर्तीचे फोटे ही न्याहाळू शकता. जेणेकरून तुमच्या मुलांना हुबेहूब लूक मिळवण्यास मदत होऊ शकेल.

मुलींसाठी खास पेहराव

आषाढी एकदशीनिमित्त मुलांचा खास पेहराव करण्यासाठी फार साहित्याची गरज पडत नाही. त्यात लहान मुली या वारीच्या पेहरावामध्ये अधिकच गोंडस दिसतात. मुलींना वारकरी महिलांचा पेहराव करण्यासाठी नऊवारी साडी किंवा परकर पोलके, छोटेसे तुळशी-वृंदावन आणि पारंपारिक दागिन्यांची आवश्यकता भासेल.

केवळ इतक्या कमी साहित्यांमध्ये तुम्ही तुमच्या छोट्या परीला वारकरी पेहरावात छान पद्धतीने तयार करू शकता.

Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 : आळंदीच्या वारीला आहे जुनी परंपरा; आळंदीला कसं पोहोचाल अन् काय पहाल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.