Ashadhi Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी चेन्नईवरून आणलीय छत्री, काय आहेत वैशिष्ट्ये

येत्या 28 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे देहूमध्ये जोरदार तयारी सुरु आहे.
Ashadhi Wari
Ashadhi Wari
Updated on

आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 28 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान होणार आहे. त्यामुळे देहूमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. अशातच मोठी वारी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी यंदा विशेष छत्री तयार करुन घेण्यात आली आहे.

श्री संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीनं नवी वेलवेटची छत्री बनवण्यात आली आहे. पुण्याच्या भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ आणि त्यांच्या मित्रमंडळींनी तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास चेन्नईहून ही छत्री तयार करून घेतली आहे.

Ashadhi Wari
Ashadhi Wari 2024: तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, पोलिसांचा कडक बंदोबस्त अन् सीसीटीव्हीचाही सोहळ्यावर वॉच

या छत्रीची काय आहे खासीयत?

छत्रीवर हस्तकला पाहायला मिळत आहे. यंदाच्या छत्रीसाठी वेलवेट कापड वापरण्यात आले आहे. त्यावरील अब्दागिरी, गरूड टक्के, रेशमी ध्वज पताका, इत्यादी विविध नक्षीकाम भाविकांचं लक्ष वेधून घेईल. तसंच छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्रही विणून घेतली आहेत.

तसेच, छत्रीमधील काड्या या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनवलेल्या आहेत. लोखंडी तारांचा वापर केलेला नाही. तसंच छत्री पकडण्यासाठी 8 फूट उंचीचा एसएस लोखंडी भक्कम पाइप वापरला आहे. छत्रीवर पितळी कळस बसवण्यात आला असून ही संपूर्ण छत्री अतिशय आकर्षक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.