Ashadhi Wari 2024: तहान-भूक विसरून विठ्ठलाच्या भेटीसाठी दूरवर चालत जाण्याचे हे आहेत फायदे, वाचाल तर तुम्हीही मनोभावे वारी कराल!

आजच्या विज्ञान युगात देखील सर्व प्रवासाच्या व्यवस्था असताना सुद्धा वारकरी पायी चालतो.
Ashadhi Wari amazing benefits of long distance Daily walking
Ashadhi Wari amazing benefits of long distance Daily walking
Updated on

खांद्यावर उंचावणाऱ्या भगव्या पताका...टाळ मृदंगाचा निनाद...माउली नामाचा अखंड गजर...अन् या वाटचालीत वरुणराजाची हजेरी. या सरींमध्ये चिंब भिजत वारकरी पंढरीच्या दिशेने जात आहेत. या सोहळ्यात लाखो वारकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. आजच्या विज्ञान युगात देखील सर्व प्रवासाच्या व्यवस्था असताना सुद्धा वारकरी पायी चालतो.

जन्मोजन्मीचे दुःख विसरण्याची ताकद पंढरीच्या वारीमध्ये आहे. त्यामुळे जन्माला आल्यानंतर एकवेळ तरी पंढरीची वारी करा असा ठाम विचार संत नामदेव महाराज आपल्या अभंगामध्ये करतात. त्यांच्याच विचारांच्या चालीवर वारकरी तहान-भूक विसरून विठ्ठलाच्या भेटीसाठी दूरवर जात असतात. या चालणाऱ्या वारकऱ्यांना इतकी शक्ती येते तरी कोठुन? असा प्रश्न अनेकांना पडतो. पंढरपूरला येणारा बहुतांश वर्ग हा शेतकरी, सर्व सामान्य कुटुंबातील आहे.

चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. अनेक तज्ज्ञ रोज 20 मिनिटं तरी चाला असा सल्ला देताना दिसतात. दररोज 10,000 पावले चालल्याने आपल्या शारीरिक हालचालींना प्रोत्साहन मिळते.

Ashadhi Wari amazing benefits of long distance Daily walking
Health Care News : वजन कमी करण्यासाठी रोज प्या जिऱ्याचे पाणी; पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल!

आयुर्मान वाढतं

चालण्यामुळे तुमचं आयुर्मान वाढतं. चालण्यामुळे आयुष्याची 16-20 वर्षं वाढतात. जास्तीत जास्त चाललं की लवकरात लवकरात मृत्यू येण्याचा धोका कमी होत जातो.

कॅलरी कमी होतात

वजन कमी करण्यासाठी चालणं हा अतिशय उत्तम मार्ग आहे. कोणत्याही वेळेला कितीही वेगाने चाललं तरी ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे वजन कमी होतं. सकाळी सकाळी चाललं तर दिवसभराच्या भुकेवरही नियंत्रण राहते.

Ashadhi Wari amazing benefits of long distance Daily walking
Health Care : डासांमुळे त्रस्त आहात? मग,'या' घरगुती उपायांच्या मदतीने डासांना पळवा

स्नायूंना बळकटी मिळते

रोजच्या रोज चालण्याने स्नायू बळकट होतात. विशेषत: पाय, बोटं, कंबर, यामुळे शरीराचं संतुलन चांगलं राहतं. चालण्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता निर्माण होते.

तणावमुक्त

रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती तणावाखाली जगताना दिसते. तुम्ही जर तुमच्या स्वतःसाठी काही वेळ काढा. आणि रोज सकाळी 10,000 पावलं चाला. ज्यामुळे तुमचा मुड सुधारतो.

Ashadhi Wari amazing benefits of long distance Daily walking
Health Care News : चिया सीड्समध्ये दडलाय आरोग्याचा खजिना; या प्रकारे आपल्या आहारात करा समावेश

व्हिटामिन डीच्या पातळीत सुधारणा

मोकळ्या हवेत फिरायला गेल्यामुळे व्हिटामिन डीच्या पातळीत सुधारणा होते. याचं कारण असं की सूर्यप्रकाश त्वचेवर पडून व्हिटामिन डीची निर्मिती होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.