Ashadhi Wari 2024: मानसिक, शारिरिक स्वास्थ्याला बुस्टर देणारी पंढरपुरची वारी

Ashadhi Wari 2024: वारीत चालून वृद्धांचे पाय का दुखत नाहीत? 'हे' आहे लॉजिक!
Ashadhi Wari 2024:
Ashadhi Wari 2024:Sakal
Updated on

Ashadhi Wari 2024: आषाढी वारीला सुरूवात झाली आहे. २८ जून ला देहू येथून तुकोबा महाराजांच्या पालखीचे पंढरपुरसाठी प्रस्थान झाले आहे. तर आज आळंदीमधून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी विविध ठिकाणांहून वारकरी आणि भाविक आळंदी जमले आहेत. वारकऱ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकरचा उत्साह आणि आनंद यावेळी पाहायला मिळतो. 'पाऊले चालती पंढरीची वाट...' असे म्हणत, टाळ, मृदुंगाचा गजर करत वारकरी पायी वारी करतात. पण यामध्ये वृद्धांची संख्या मोठी असते. पण वारीत चालताना वृद्ध माऊलींचे पाय दुखत नाही ना कोणत्या समस्या निर्माण होत नाही यामागे कोणते कारण असू शकते हे जाणून घेऊया.

वारकरी संप्रदायातील वृद्ध नागरिकांना वर्षभर वारीची ओढ लागलेली असते. वर्षभर शेतात राबलेले शेतकरी थकून भागून जातात. यातून विरंगुळा आणि पांडुरंगावर असलेली श्रद्धा यामुळे ते भक्तिरसामध्ये न्हाहून जातात. वारकरी संप्रदायामध्ये जात धर्म वर्ण गरीब श्रीमंत असला कसलाच भेद नाही. हे विशेष.

इतकं वय झालं तरी ते आनंदाने चालतात. कारण त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा असते. राज्यभरातील वारकरी एकमेकांना एका वर्षानंतर वारीमध्ये भेटतात पांडुरंगाच्या भेटीसोबतच इतर मित्र मैत्रिणींना भेटण्यासाठीची ही मोठी संधी असते. हात-पाय यामुळे दुखत नाहीत कारण दैनंदिन जीवनातील कौटुंबिक सुख - दुःख सर्व विसरून ही मंडळी वारीत रमतात. भक्ती भाव बाजूला केला तर महाराष्ट्रातील तमाम लाखो वारकऱ्यांसाठी ही एक सहलच असते असं म्हटलं तर वावग ठरणार नाही...

Ashadhi Wari 2024:
Ashadhi Wari 2024: वारकऱ्याच्या गळ्यात असलेल्या तुळशीमाळेचं जाणून घ्या महत्व अन् आरोग्यदायी फायदे

आपल्या मनातील सर्व दुःख ते पांडुरंगाच्या चरणी मांडतात. सोप्या भाषेत गऱ्हाण करतात अन मोकळं होतात... ज्याप्रकारे मानसिक शांतता लाभण्यासाठी अनेकजण मेडिटेशन करतात. त्याचप्रकारे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील लाखो वारकरी वारीच्या माध्यमातून ही साधना करतात. त्यामुळे मानसिक ट्रेस कमी होतो आणि आपसुकच शारीरिक व्याधी देखील ते विसरून जातात. पांडुरंगावर असलेली प्रचंड श्रद्धा यामुळे त्यांचं मन हलकं होऊन जातं आणि सुमारे महिनाभर पायी चालत सवंगड्या सोबत एक महिना घालवल्यानंतर त्यांना फ्रेश वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.