Benefits of Ashwagandha: अश्वगंधाचे हे फायदे एकदा पाहाच; स्त्री-पुरुषांना अमृतापेक्षा कमी नाही

अलीकडच्या काळात आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पतींचे अनेक फायदे आपल्यासमोर विज्ञानाच्या माध्यमातून समोर येत आहेत.
Benefits of Ashwagandha
Benefits of Ashwagandha
Updated on

Ashwagandha Benefits for Male & Female: अलीकडच्या काळात आयुर्वेदातील अनेक औषधी वनस्पतींचे अनेक फायदे आपल्यासमोर विज्ञानाच्या माध्यमातून समोर येत आहेत. अश्वगंधा महिलांसोबत पुरुषांना सुद्धा अनेक गोष्टीत वरदान ठरत आहे.

अश्वगंधाचा (Ashwagandha) शरीराला पिळदार वळण देण्यासाठी आकर्षक बनविण्यासाठी सुद्धा आता वापर होत आहे. अश्वगंधाचे अनेक औषधी गुणधर्म असल्याने आता अनेक औषधांमध्ये सुद्धा अश्वगंधाचा वापर केला जातो. अश्वगंधाला सामान्यतः रोगप्रतिकारक शक्तीवर्धक म्हणून सुद्धा आता मान्यता मिळाली आहे.

अश्वगंधाचे स्नायूंच्या वाढीस प्रोत्साहन देण्याव्यतिरिक्त शरीरातील चरबी कमी करण्यासाठी खूप महत्वाचे ठरते (Ashwagandha helps in maintain cholesterol). अश्वगंधा शरीरातील साखरेची पातळी कमी करून मधुमेहापासून सरंक्षण करते (Ashwagandha works on diabetes). अश्वगंधा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यात सुद्धा मदत करते, अश्वगंधाचा तणाव, चिंता, नैराश्य यासारख्या मानसिक आजारावर उपचार घेण्यासाठी सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो.

अश्वगंधात आयुर्वेदिक बरीच घटके असल्याने त्याने शरीराची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी तसेच ह्रदयाचे विविध आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी सुद्धा मदत होते. अश्वगंधामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे मेंदूशी संबंधित दुखापतींमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कर्करोगासारख्या गंभीर आजारात सुद्धा अश्वगंधाचा उपयोग त्याच्या पेशींच्या वाढीस थांबवण्यात वापरण्यात येते.

आता अश्वगंधाचे पुरुषांच्या आरोग्यात किती महत्व आहे आणि त्याचा पुरुषांना कसा फायदा होऊ शकतो हे आपण जाणून घेऊया,

Ashwagandha
Ashwagandhasakal

अश्वगंधाचे पुरुषांना फायदे (Ashwagandha benefits for Men's):

शरीरातील जिवंतपणा टिकवून ठेवण्यात अश्वगंधाचा खूप मोठा फायदा पुरुषांना होऊ शकतो. शरीरातील सर्व स्नायूंच्या बळकटीसाठी अश्वगंधा एक वरदान ठरू शकते. त्यासोबतच पुरुषांमध्ये जर टेस्टेरॉनचे प्रमाण कमी असेल त्यामुळे ते जर लैंगिक समस्यांना सामोरे जात असतील तर अश्वगंधा हे त्यासाठी बूस्टर ठरू शकते.

वाढत्या वयामुळे पुरुषांमध्ये टेस्टोरॉनचे प्रमाण कमी होऊ शकते पुरुषांची ऊर्जा सुद्धा कमी होऊ शकते. अश्वगंधाच्या नियमित फायद्याने पुरुषांच्या टेस्टोरॉनची पातळी हि सुधारून पुरुषांना लैंगिक समस्या पासून मुक्ती मिळू शकते.

पुरुषांना मानसिक तणावांमुळे सुद्धा अनेक गंभीर आजारांना सामोरे जावं लागते. पुरुषांच्या असलेल्या लैंगिक समस्येत इरेक्टाइल डिसफंक्शन हा एक महत्वाचा आजार आहे. पुरुषांमध्ये होणाऱ्या या आजारामुळे पुरुषांना अनेक वेळा नैराश्याला सामोरे जावं लागतं आणि त्याचा त्यांच्या आत्मविश्वासावर सुद्धा परिणाम होतो. पुरुषांमध्ये हि सर्व आढळणारी कारणे हि मानसिक आरोग्य व्यवस्थित नसण्याची लक्षणे आहेत. यासर्व गोष्टीत अश्वगंधा पुरुषांना वरदान म्हणून लाभदायी ठरते.

पुरुषांमध्ये अनेक वेळा तणावामुळे किंवा जेनेटिक कारणांमुळे पुरुषांची सुपीकता कमी होते, त्यामुळे पुरुषांचे वंध्यत्व तसेच लैंगिक कार्यावर त्याचा खूप परिणाम होतो. अश्वगंधाच्या नियमित सेवनाने पुरुषांचे वंध्यत्व सुधारण्यात खूप फायदा होऊन त्यांचे लैंगिक कार्य सुद्धा पूर्ववत साधारण होण्यास मदत होते. आणि त्यांची सुपीकता पातळी सुद्धा सुधारते. अश्वगंधामुळे पुरुषांची शुक्राणूंची संख्या वाढून त्याची गतिशीलता सुद्धा वाढते हे वैद्यकीय अभ्यासाने आता मान्य केले आहे.

पुरुषांचे फायदे पाहिल्यानंतर आता अश्वगंधाचे महिलांसाठी काय फायदे आहेत हे आपण पाहूया,

अश्वगंधाचे महिलांसाठी फायदे (Ashwagandha benefits for Women's):

महिलांना अनेक कारणांमुळे त्यांच्या मासिक पाळीचे अनेक त्रास होतात. मासिक पाळीच्या अनियमिततेने महिलांमध्ये डोकेदुखी, झोपेच्या समस्या, अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात. संशोधकांनी केलेल्या संशोधनात अश्वगंधाच्या नियमित सेवनाने महिलांना त्यांचे मासिक पाळीची नियमितता सुधारण्यात मदत होते. तसेच मासिक पाळीच्या अनियमिततामुळे त्यांना होणाऱ्या समस्येवर सुद्धा अश्वगंधामुळे फायदा होतो.

महिलांमध्ये सुद्धा पुरुषांप्रमाणे अनेक लैंगिक आजार असतात. त्यातील कामवासना, कामोत्तेजनाचा अभाव, लैंगिक संबंधांवेळी असाधारण त्रास, वंध्यत्व, प्रजनन क्षमतेची कमी अश्या अनेक समस्यांवर अश्वगंधा हे अतिशय प्रभावी औषध म्हणून काम करते. महिलांसाठी अश्वगंधा हे एक अमृत रसायन म्हणून काम करते.

तुम्हाला हि माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अश्याच प्रकारचे लेख वाचण्यासाठी फॉलो करा www.esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.