Astro Tips For Good Relation : वैवाहिक जिवानात सुखी संसाराचा गाडा चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात आर्थिक समस्या हे मोठे कारण असते. अनेकदा एकमेकांना वेळ न देऊ शकल्याने नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात अन् या गैरसमजांतून नवराबायकोच्या नात्यामध्ये वाद-विवाद व्हायला सुरुवात होते. अनेकदा ही भांडणे इतकी विकोपाला जातात कि यामुळे साता जन्माची गाठ बांधलेल्या नात्यात दरी निर्माण होते. पती- पत्नीच्या पवित्र नात्यातील प्रेम आजन्म कायम राहावे यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगितले जातात. हे उपाय केल्याने नवरा-बायकोमधील भांडणे न होता त्यांच्या नात्यात प्रेम अन् विश्वास वाढेल, यातूनच वैवाहिक आयुष्य अधिक समृद्ध होऊन नातं मजबुत होईल. चला तर मग हे उपाय जाणून घेऊया.
(Astro Tips For Good Relations important to avoid fight between Husband and wife)
पती- पत्नीच्या नात्याची पवित्र गाठ ही किरकोळ कारणांनी कमकुवत होऊ नये यासाठी हे उपाय अवश्य करा.
1) भगवान विष्णू अन् लक्ष्मीची कृपा जीवनात सुख-समृद्धी मिळवून देते. त्यामुळे दांपत्याने भगवान विष्णू- लक्ष्मीची मनोभावे पुजा करावी.
2) घरातील देव्हाऱ्यात तांदळावर लक्ष्मीची मुर्ती स्थापित करावी.
3) सोमवारी किंवा प्रदोषच्या दिवशी महादेवाला जल (पाणी) व दुधाने अभिषेक करावा.
4) मंगळवारी दोघांनी गणपती बाप्पाला लाल रंगाचे फुल अर्पण करावे.
5) पती- पत्नीने दररोज नित्यनियमाने दुर्गा स्तोत्र वाचन करावे.
6) घरातील अग्नेय कोपऱ्यात पाणी टाकू नये. तथा घरातील पाण्याचे स्त्रोत अग्नेय दिशेला नसावे.
7) दोघांनी एकत्रितरित्या गायीला चण्याची डाळ- गुळ खाऊ घालावे.
8) पत्नीने महिन्यातून एकदा सुवासिनीची ओटी भरावी.
9) दोघांनी चिमणीला साखर खाऊ घालावी.
10) पती- पत्नी दोघांनी पुर्व दिशेला डोक करुन झोपावे.
11) घरात कधीही दुध उतु जाऊ देवू नये.
12) घरातील उंबऱ्यासमोर कधीह चप्पल काढू नये. यासह पालथी चप्पल ठेवू नये.
हे उपाय केल्याने पती- पत्नीमध्ये वाद तर होणारच नाही. मात्र त्यांच्या नात्यातील गोडवा वाढत जाऊन घरात सुख- समृद्धी नांदेल.
माहिती विवेचन - विजय राजेंद्र जोशी, गुरुजी (ज्योतिष अभ्यासक, नाशिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.