Astro Tips : देवाला नारळ वाढवायचा की अर्पण करायचा?

कोणत्या देवाला नारळ वाढवायचा अन् कुठे अर्पण करायचा?
Astro Tips
Astro Tipsesakal
Updated on

Astro Tips : हिंदू धर्मात नारळाचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या कोणते नारळ कधी आणि कोणत्या देवतेला अर्पण करावे. पूजा आणि शुभ कार्यात नारळ अर्पण करण्याचे महत्त्व आहे. पण तुम्हाला माहीत आहे का नारळ कोणत्या देवतेला अर्पण करावा? हिंदू धर्मात कोणत्या देवतेला नारळ अर्पण केले जाते याचे अनेक नियम आहेत. आज आपण त्याबद्दलच जाणून घेऊयात.

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात.

यासोबतच वेगवेगळ्या देवतांची पूजा करण्याच्या पद्धतीतही फरक आहे. म्हणूनच हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस विशेष मानला जातो आणि आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो.

Astro Tips
Astro Tips : अंगठी कुठल्या बोटात घालावी? शास्त्रानुसार अंगठी घाला, जीवनात आनंदाचा वर्षाव होईल

अर्थातच त्याचा वापर केला जातो. नवीन दुकान सुरू करणे, लग्न, नवीन वाहन, सण-उत्सव आणि साप्ताहिक उपवास इत्यादी सर्व प्रसंगी नारळाचे महत्त्व आहे. दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये बंगाली समाजातील लोक पूजेमध्ये शहाळी आणि ताजे नारळ वापरतात.

तांबे कलश किंवा मातीचा कुंभावर आणि शहाळीनारळावर सिंदूराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात .

ओल्या नारळाला शहाळे असे म्हणतात. याचे पाणी शक्तिवर्धक, थंड व खनिजसंपन्न असते. आजारी, अपचन, जुलाब झालेल्या व्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते. शहाळ्यातून निघणाऱ्या पक्व नारळाला शुभ प्रसंगी श्रीफळ म्हणतात.

आपल्याकडचे कोळी बांधव नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करतात. समुद्रातील माशांवरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. त्यामुळेच ते समुद्राला देव माणून त्याची पुजा करतात. नारळ अर्पण करतात.

हिंदू धर्माशी संबंधित जवळजवळ सर्व देवी-देवतांना नारळ अर्पण केले जाते आणि नारळ निश्चितपणे पूजा सामग्रीमध्ये समाविष्ट आहे. कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण आहे. जाणून घ्या पूजेत नारळ का आवश्यक आहे, त्याचे महत्त्व काय आहे.

Astro Tips
Astro Tips : पत्नीने पतीच्या डाव्याबाजूस का झोपावे? जाणून घ्या फायदे

पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी माता लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू सोबत आणले होते. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. यामध्ये त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश राहतात असे सांगितले जाते.

नारळावर केलेल्या छिद्राची तुलना भगवान शंकराच्या डोळ्याशी केली जाते आणि जवळजवळ सर्व विधींमध्ये त्याचा वापर केला जातो. नारळाविषयी आणखी एक समजूत अशी आहे की मानवी स्वरूपात नारळ विश्वामित्रांनी तयार केला होता.

एकदा विश्वामित्र इंद्रावर रागावले आणि दुसरा स्वर्ग बांधू लागले. दुसरे जग निर्माण करताना त्यांनी माणसाच्या रूपात नारळ निर्माण केला. त्यामुळे नारळाच्या शेंड्याच्या बाहेरील बाजूस दोन डोळे आणि एक तोंड अशी रचना असते.

Astro Tips
Astro Tips : मनगटातला लाल धागा पवित्र; पण २ राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये!

पूजेत कोणत्या देवतेला नारळ अर्पण करावा?

  1. नारळाला श्रीफळ म्हणतात. श्रीफळ म्हणजे माता लक्ष्मी होय. पण वेगवेगळ्या वेळी नारळ अर्पण करण्याचे वेगळे महत्त्व आहे. सात्विक पूजेमध्ये नारळ वाढवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, देवतांना नारळ अर्पण करण्याची निवड.

  2. शंकराच्या मंदिरात कधीही नारळ फोडला जात नाही, तर फक्त संपूर्ण नारळच अर्पण केला जातो. ज्या देवतेत शंख आहे त्या देवतेलाही ओले नारळ अर्पण करावे.

  3. पूजेत अखंड नारळाचा वापर केला जात नाही. हे फक्त पेय म्हणून वापरले जाते.

  4. बाबा भैरवाला नारळ अर्पण केल्यावर तो फोडला जातो आणि या नारळाच्या मध्यभागी काळी मिरी आणि लवंग इत्यादी किंवा आपण प्रसाद म्हणून जे काही अर्पण करतो ते टाकले जाते.

  5. विष्णूजी आणि लक्ष्मीजींना नारळ कधीही अर्पण करू नयेत. तर तो वाढवावा आणि त्याचे पाणी घरच्यांनी ग्रहण करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()