मुंबई : अगदी जुन्या काळापासून भारतीय संस्कृतीत मसाल्यांचा वापर केला जातो. जेवणात रंगत आणण्यासाठी तर मसाले वापरतातच पण अनेक व्याधींवरती उपाय म्हणूनही खडे मसाले उपयुक्त आहेत. पण यांचा संबंध थेट तुमच्या ग्रहांशीही असतो हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही नक्की कोणते मसाले खातात याने तुमच्या ग्रहाची स्थिति बदलली जाऊ शकते.
कोणत्या मसाल्याचा संबंध कोणत्या ग्रहाशी?
मीठ - चंद्र
तिखट - सूर्य
हळद - गुरु
जिरे किंवा जिरे पूड - राहू, केतू
कोथिंबीर - बुध
काळी मिरी किंवा काळी मिरी पावडर - शनि
आमचूर - केतू
गरम मसाला - राहू
कसूरी मेथी - मंगळ
1. बडीशेप
बडीशेप खाल्ल्याने व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्र आणि चंद्र बलवान होतो. तुम्ही खडी साखर आणि बडीशेपही खाऊ शकतात. जेवण झाल्यावर बडीशेप खाण्याची आपल्याकडे खूप आधी पासूनच सवय आहे त्याचं हेही एक कारण आहे. शिवाय यामुळे अॅसिडीटी, मळमळ याचा त्रास होत नाही. जर कोणत्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर तेव्हा गुळासोबत बडीशेप खा. याने तुमचा मंगळ प्रभावी होईल आणि तुमच काम पूर्ण होईल.
2. काळी मिरी
काळ्या मिरीच्या सेवनाने कुंडलीतील शुक्र आणि चंद्राची स्थिती सुधारते आणि याच्या सेवनाने कफ होत नाही आणि स्मरणशक्ती वाढते. तांब्याच्या भांड्यात काळी मिरी ठेवल्याने घराला दृष्ट लागत नाही शिवाय शनि ग्रहाची वक्री होत नाही.
3. दालचिनी
दालचिनीचे सेवन केल्याने मंगळ आणि शुक्राची स्थिती सुधारते. जर तुमचा मंगळ आणि शुक्र वक्री असेल तर मधामध्ये दालचिनी मिसळून पाण्यासोबत खावं. अशाने तुमची रोगप्रतिकरशक्तीही वाढेल आणि हिवाळ्यात कफाचा त्रासही होणार नाही.
4. वेलची
वेलची खाल्ल्याने बुध ग्रहाची वक्री नष्ट होते, शिवाय जर कोणाला दूध पचण्यात अडचण येत असेल तर दुधात वेलची टाकून प्यायल्याने त्रास होणार नाही. ज्यांना बॉडी बनवायला किंवा कॅल्शियमसाठी दूध प्यावे लागते, परंतु ते पचण्यात अडचण येते अशा लोकांसाठी हे फायदेशीर ठरत. शिवाय याने दुधाची चवही टेस्टी लागते.
5. जवस
जवसाचा उपाय सूर्य आणि गुरु साठी फायदेशीर आहे. शिवाय जवसाच्या पिठाची भाकरी खाणंही तब्बेतीसाठी खूप गरजेच आहे.
6. कसूरी मेथी
कसूरी मेथीच्या नियमित सेवनाने मंगळाची स्थिती सुधारते. शिवाय अनेक साऊथ इंडियन पदार्थांमध्ये कसूरी मेथीचा वापर केला जातो जी एक वेगळाच फ्लेवर देते.
7. हिंग
हिंगाच्या नियमित सेवनाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे वाताचा आणि पित्ताचा त्रास नाही होत. हिंग हा बुध ग्रहाच प्रतिनिधित्व करतो, शिवाय हिंगामुळे तुमची पचनशक्ती वाढते.
8. जिरे
जिरे राहु आणि केतूचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे जेवणात जिरे वापरल्याने तुमच्या दैनंदिन जीवनात सुसंवाद आणि शांतता कायम राहते.
9. हळद
हळदीचे सेवन केल्याने गुरू ग्रह बलवान होतो, यासोबतच हळदीचा एक तुकडा पिवळ्या धाग्यात बांधून गुरुवारी गळ्यात घातल्याने गुरु ग्रहाचे चांगले फळ मिळते.
Disclaimer: सादर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टीच समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.