Rudraksha Benefits: रूद्राक्ष घालण्याचे अनेक फायदे; पण तो या जागी सोबत नेऊ नये, नाहीतर...

Rudraksha Benefits: कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष घालावा?
Rudraksha Benefits in Marathi
Rudraksha Benefits in Marathiesakal
Updated on

Rudraksha Benefits: रुद्राक्ष म्हणजे रुद्रांचा अर्थाच शंकरांचा अक्ष. म्हणजे भगवान शंकरांचे डोळे. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूतून झाली असे मानले जाते.

कठोर तपश्चर्येनंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून जमिनीवर पडलेल्या अश्रूंमधून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली.

Rudraksha Benefits in Marathi
Astro Tips : या ५ राशींचे लोक नात्यांना फुलाप्रमाणे जपतात... तुमची रास कोणती?

रूद्राक्षाला हिंदू धर्मग्रंथात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेंदुचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी रुद्राक्ष म्हणून ओळखली जाते.

रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे.

  • रूद्राक्षाचे प्रकार

दोन मुखी रुद्राक्ष, तीन मुखी रुद्राक्ष, चतुर्मुखी रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष, सहा मुखी रुद्राक्ष, सप्तमुखी रुद्राक्ष, अष्टमुखी रुद्राक्ष, नऊ मुखी रुद्राक्ष, दशमुखी रुद्राक्ष, एकादश मुखी रुद्राक्ष, द्वादश मुखी रुद्राक्ष, त्रयोदशमुखी रुद्राक्ष, चतुर्दशमुखी रुद्राक्ष

  • रूद्राक्ष परिधान करण्याचे नियम

स्मशानभूमीत - रुद्राक्षाची माला किंवा रुद्राक्ष कोणत्याही रूपात धारण करून स्मशानभूमीत जाऊ नये. स्मशानभूमी अपवित्र जागा आहे त्यामूळे तिथे दैवी शक्ती असलेला रूद्राक्ष नेऊ नये.

Rudraksha Benefits in Marathi
Astro Tips : या ५ राशींचे लोक नात्यांना फुलाप्रमाणे जपतात... तुमची रास कोणती?

एका व्यक्तीने धारण केलेला रुद्राक्ष पुन्हा दुसऱ्या व्यक्तीने कधीही धारण करू नये. रुद्राक्षाची माळ परिधान करताना त्यातील मणी विषम संख्येचे असावेत याची विशेष काळजी घ्या. लक्षात ठेवा की ही रुद्राक्ष माळ 27 मणांपेक्षा कमी नसावी.

धाग्याव्यतिरिक्त रुद्राक्ष चांदी किंवा सोन्यामध्ये जडवून देखील धारण करता येतो. रुद्राक्ष कधीही काळ्या धाग्यात धारण करू नये. त्याऐवजी ते लाल किंवा पिवळ्या रंगाचे धाग्यामध्ये गुंफणे शुभ मानले जाते.

रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. त्याला अशुद्ध हातांनी स्पर्श करू नये. सकाळी रुद्राक्ष धारण केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी रुद्राक्ष उतरवताना रुद्राक्ष मंत्र आणि रुद्राक्ष उत्यन मंत्राचा नऊ वेळा जप करावा.

रूद्राक्षाचे फळ
रूद्राक्षाचे फळesakal
Rudraksha Benefits in Marathi
Saturday Astro Tips : मालामाल व्हायचं आहे? मग याच दिवशी कापा नखं...

मयताच्या घरी - ज्या ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला असेल त्या ठिकाणी रुद्राक्ष धारण करून जाऊ नका. तुमच्या घरात एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल तर रुद्राक्ष उतरवून योग्य ठिकाणी ठेवा. मगच त्या घरी प्रवेश करा.

शौचालय- शौचालयात रूद्राक्ष घालून जाणे अवैध मानले जाते. ती पवित्र जागा नसल्याने तिथे रूद्राक्ष घेऊन जाणे चुकीचे असल्याचे शास्त्र सांगते.  

दारू, मांसाहार करताना- जेव्हा तूम्ही मांसाहार करत असता. किंवा नशा करत असता तेव्हा रूद्राक्ष बाजूला काढून ठेवा.

Rudraksha Benefits in Marathi
Astro Tips : राम भक्त हनुमानाच्या या ८ सिद्धींनी तुम्ही करू शकतात जगावर राज्य, जाणून घ्या

बाळाला पाहताना - जेव्हा नुकतेच एखाद्या बाळाचा जन्म झाला आहे. तर, त्याला घेताना त्याला पाहताना रूद्राक्ष धारण करू नये. हॉस्पिटलसारख्या ठिकाणी रूद्राक्ष घालून गेल्याने त्याची पॉझिटीव्ह उर्जा संपते.

झोपण्यापूर्वी - झोपायला जाण्याआधी गळ्यात, हातात असलेला रूद्राक्ष काढून ठेवावा. तसे केल्यास त्यातून तूम्हाला मिळणारी उर्जा टिकून राहते.

  • रूद्राक्ष धारण करताना काय करावे

रुद्राक्ष धारण करताना भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा अवश्य जप करा. रुद्राक्ष नेहमी आंघोळीनंतर धारण करावा.

Rudraksha Benefits in Marathi
Astro Tips : रागावर नियंत्रण करून प्रगतीचे दार उघडतो हा रत्न

राशीनूसार कोणता रूद्राक्ष घालावा

मेष, कर्क, तूळ, मकर कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते. याशिवाय मेष राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी, वृषभ राशीच्या व्यक्तींनी षण्मुखी, मिथुन राशीच्या व्यक्तींनी चारमुखी, कर्क राशीच्या व्यक्तींनी दोनमुखी, सिंह राशीच्या व्यक्तींनी एकमुखी, बारामुखी, कन्या राशीच्या व्यक्तींनी चारमुखी रूद्राक्ष घालावा.

तुळ राशीच्या व्यक्तींनी षण्मुखी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी, धनु राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी, मकर राशीच्या व्यक्तींनी सातमुखी, कुंभ राशीच्या व्यक्तींनी सातमुखी आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे. मात्र, यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जाते.

विविध प्रकारचे रूद्राक्ष
विविध प्रकारचे रूद्राक्षesakal
Rudraksha Benefits in Marathi
Astro tips : रस्त्यावर पैसे सापडले तर काय करावं? काय सांगतं शास्त्र!

कसा असतो रुधिरवृक्ष

रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव 'एलिओकार्पस स्फेरिकस' असे आहे. हा सदाहरित वृक्ष हिमलयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी, लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बंगलेत लोंब्या येऊन पांढरीशुभ्र, मंद वासाची फुले येतात. एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात.

खरा रूद्राक्ष कसा ओळखावा?

खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि सरळ आहे. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे, याची खात्री बाळगायला हरकत नाही.

जे पाण्यात हळुवारपणे बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे. रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी असला तरी ते काटे बोथट, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते. खऱ्या रुद्राक्षाला कीड लागत नाही, असे सांगितले जाते.

Rudraksha Benefits in Marathi
Astro Tips : तळ हातावर असलेल्या तीळाचा अर्थ माहितीये?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.