Astro Tips: जास्वंदाच्या फुलाने उजळेल तुमचं नशीब; आजच घराच्या कोपऱ्यात लावा रोपटे

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी जास्वंदाचे फुल फायदेशीर आहे.
Astro Tips
Astro Tipssakal
Updated on

गणपती बाप्पाचे आवडते फुल म्हणून किंवा केसांसाठी खूप उपयुक्त फुल म्हणून जास्वंदाच्या फुलाची ओळख आपल्याला आहेच पण आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी देखील हे फुल फायदेशीर आहे. जास्वंदाचे फुल फक्त दिसायला सुंदर आहे असे नाही त्यात अनेक आयुर्वेदिक/ औषधी गुणधर्म आहेत. त्याचबरोबर या फुलाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळू शकतो.

Astro Tips
zendu flower rate : पुण्यातील फूलबाजारात झेंडूनं भाव खाल्ला, शंभरीचा टप्पा ओलांडला
  • जर तुमचा मंगळ वक्री असेल आणि त्यामुळे तुमच्या लग्नात उशीर होत असेल तर यापासून सुटके साठी घरात लाल रंगाचे जास्वंदाचे झाड लावा. याचा लवकरच तुम्हाला फायदा दिसेल.

  • जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळे त्रस्त असाल. खूप प्रयत्न करूनही पैसे हातात टिकत नसतील तर लक्ष्मी देवीला आणि हनुमानाला हे जास्वंदाचे फूल अर्पण करा. यामुळे तुमची गरिबी दूर होईल.

  • जास्वंदाचे फूल अनेक रंगात येते. शुक्रवारी घराजवळील मंदिरात जाऊन दुर्गा देवीला लाल जास्वंदाचे फूल, दुधापासून बनवलेली बर्फीही अर्पण करा. किमान 11 शुक्रवार हा प्रयोग करा. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.

Astro Tips
Astro Tips : गरीबी होणार छूमंतर, करा या डाळीचा उपाय
  • दुसरीकडे, जर तुम्ही न्यायालयाशी संबंधित प्रकरणांमध्ये बराच काळ अडकले असाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता.

  • सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जास्वंदाचे फूल उपयुक्त आहे. यासाठी दररोज सूर्योदयापूर्वी उठून उगवत्या सूर्याला लाल जास्वंदाच्या फूला सकट पाण्याचे अर्घ्य द्यावे, असे केल्याने तुमची संपत्ती वाढेल. जीवनात मान-सन्मान वाढेल.

  • ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची पूजा जास्वंदाच्या फुलाशिवाय अपूर्ण मानली जाते.

  • जर तुमच्या कुंडलीत सूर्य दोष असेल तर घराच्या पूर्व दिशेला लाल जास्वंदाचे रोप लावल्याचा फायदा होतो. जर तुम्ही फ्लॅटमध्ये रहात असाल तर तुम्ही छोट्या कुंडीमध्येही लागवड करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()