Foods to prevent hair loss: सुंदर आणि काळेभोर तसचं दाट केस प्रत्येकालाच हवे असतात. केसामुळे व्यक्तीचं सौंदर्य Beauty खुलतं. मात्र अलिकडे कमी वयातच केस गळणं, केस पांढरे होणं आणि टक्कल पडणं अशा अनेक समस्या निर्माण होवू लागतात. Avoid eating these substances to keep health of your hair
केस निरोगी राहण्यासाठी पोषक आहार गरजेचा आहे. यासाठी आहारामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ तसचं, बदाम, अक्रोड अशा पदार्थांचा आहारात Diet समावेश करणं गरजेचं आहे.
ज्याप्रमाणे काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने केसांचं आरोग्य Hair Health सुधारतं. त्याचप्रमाणे काही पदार्थांच्या सेवनामुळे केसांचं आरोग्य बिघडू शकत. त्यामुळे अशा पदार्थांचा आहारात समावेश टाळावा. Hair Care
गोड पदार्थ
जास्त साखर असलेल्या म्हणजेच गोड पदार्थांचं सेवन केल्याने देखील केसांचं आरोग्य बिघडू शकतं. अति गोड पदार्थांच्या सेवनामुळे हार्मोनल बॅलन्स बिघडतो याचा परिणाम केसांच्या वाढीवर होतो. यामुळे जास्त गोड पदार्थांचं सेवन करू नये. Hair loss Food
फास्ट फूड
फास्ट फूड किंवा जंक फूडमध्ये अनहेल्दी फॅट्स Fats आणि सोडियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. तसचं या पदार्थात वापरण्यात येणाऱे इतर घटक म्हणजेच चीज, सॉस वेगवेगळे स्प्रेड अशा घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह देखील असतात. याचा शरीरासोबत केसांवरदेखील परिणाम होतो. त्यामुळे फास्ट फूट न खाणं हाच उत्तम पर्याय आहे.
हे देखिल वाचा-
अल्कोहोल
केसाच्या आरोह्यामध्ये केरेटिन हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. केरेटीनमुळे केस चांगले रहाण्यास मदत होते. केरिटीन हे एक प्रकारचं प्रोटीन असून अल्कोहोलचा त्यावर परिणाम होतो. यामुळे केस कुमकुवत होवून गळू लागतात. तसचं केसांची चकमही कमी होते.
तसचं अल्कोहोलच्या सेवनामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण झाल्याने देखील केसांची वाढ खुंटते. तसचं केस रुक्ष दिसू लागतात.
कॅफेन
जास्त प्रमाणात कॅफेनचं सेवन केल्यास त्याचा केसावर नकारात्मक परिणाम होवू शकतो. कॅफेनच्या अति सेवनामुळे डिहाड्रेशनची समस्या निर्माण होवू शकते. ज्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं आणि केस निर्जीव तसंच निस्तेज दिसू लागतात.
मासे
माशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी१२ आणि व्हिटॅमिन डी उपलब्ध असून त्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होत असली तरी काही माशांमुळे केसांचं आरोग्य बिघडू शकतं. अनेक माशांमध्ये मर्क्युरी म्हणजेच पाऱा आढळतो.
शिवाय गेल्या काही वर्षांमध्ये वातावरणातील बदल आणि वाढत्या मासेमारीमुळे माश्यांमध्ये मिथाइल-मर्क्युरीचं प्रमाण वाढतं चाललं आहे. पाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात केस गळण्याची समस्या निर्माण होवू शकते. यासाठीच बांगडा, मोरी मासा, तार मासा आणि कुपा माश्याच्या काही प्रकारांमध्ये पारा आढळत असल्याने अशा माश्यांचं सेवन कमी प्रमाणात करावं.
कच्ची अंडी
अनेकजण प्रोटीनसाठी कच्च्या अंड्याचं सेवन करतात. अंडी ही केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी उत्तम असली तरी कच्च्या अंड्याचं खास करून अंड्याच्या पांढऱ्या भागाचं सेवन केसांसाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे शरीरात बायोटीनची करतरता निर्माण होवू शकते. बायोटीन हे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असं व्हिटॅमिन असल्याने त्याचा केसांवर परिणाम दिसू लागतो.
यासाठीच केसांचं आरोग्य जपण्यासाठी आहारातून या पदार्थांचं प्रमाण कमी करा. तसचं प्रोटीनयुक्त आणि व्हिटॅमिनयुक्त पादार्थांचा आहारामध्ये समावेश करा.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.