Weight Loss : वजन कमी करण्यासाठी संध्याकाळी ७नंतर टाळा ही कामे

तुमचे वजन कमी होईल. म्हणूनच रात्री उशिरापर्यंत जागे राहू नका. झोपण्याची वेळ सेट करा आणि त्याच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा.
Weight Loss
Weight Lossgoogle
Updated on

मुंबई : आपल्याला सर्वांना निरोगी राहायचे असते. निरोगी राहण्यासाठी योग्य वजन असणं खूप गरजेचं आहे. वाढलेले वजन सर्वांनाच त्रास देते. लठ्ठपणामुळे अनेक आजारांचाही धोका असतो.

वजन कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे खूप महत्वाचे आहे. जेव्हा जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा आपण नेहमी शॉर्टकटच्या शोधात असतो. पण प्रत्यक्षात वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. यासाठी सकस आहार, योग्य जीवनशैलीच्या सवयी निवडणे आवश्यक आहे.

अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी अनेक महागड्या डाएट प्लॅन्सचा अवलंब करतो, पण तरीही वजन झपाट्याने कमी होत नाही. यामागे आपल्या काही सवयी कारणीभूत आहेत.

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रवासात असाल तर संध्याकाळी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. काही गोष्टी संध्याकाळी ७ नंतर करू नयेत. डायटीशियन राधिका गोयलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. (avoid these things after 7pm to loose weight)

Weight Loss
Job Alert : BDL १०० जागांवर भरती; अभियंत्यांना संधी

कॅफिनयुक्त पेयांचा वापर

संध्याकाळी ७ नंतर कॅफिनयुक्त पेये घेऊ नका. तुम्ही चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स संध्याकाळी उशिरा किंवा रात्री प्यायल्यास ते तुमच्या झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतात. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासावर होऊ शकतो. त्यामुळे संध्याकाळी ७ नंतर कॅफिनयुक्त पेये पिऊ नका. त्याऐवजी तुम्ही हर्बल चहा किंवा कोमट पाणी पिऊ शकता.

फळांचे सेवन

फळे आरोग्यासाठी खूप चांगली असतात, पण जर तुम्ही रात्री उशिरा फळे खाल्ली तर ते तुमची पचनक्रिया मंदावते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. फळांचे योग्य पोषण होण्यासाठी ते दिवसा खा.

Weight Loss
Breast Milk : आईचं दूध वाढवण्याचे २ सोपे उपाय

उशिरा उठणे

अनेकदा लोक याकडे लक्ष देत नाहीत, पण झोपेचा थेट संबंध वजनाशी असतो. निरोगी राहण्यासाठी किमान ७-८ तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यास हार्मोनल असंतुलन होऊ शकते.

ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल. म्हणूनच रात्री उशिरापर्यंत जागे राहू नका. झोपण्याची वेळ सेट करा आणि त्याच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा.

उच्च कॅलरी फॅटी पदार्थ

जर तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा संध्याकाळी उशिराने जास्त कॅलरीयुक्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तर त्याचा थेट तुमच्या वजनावर परिणाम होतो.

जास्त कॅलरी असलेले अन्न पचायला जास्त वेळ लागतो, ज्यामुळे वजन वाढू शकते. संध्याकाळच्या जेवणात पोषणयुक्त आणि कमी उष्मांक असलेले अन्न खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.