Skin Care Tips : बेसनासोबत 'या' गोष्टी त्वचेवर लावू नका, अन्यथा होऊ शकते नुकसान..

बेसनाचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी चेहऱ्यासाठीही बेसन उपयुक्त आहे.
Skin Care Tips
Skin Care Tipssakal
Updated on

त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी आणि त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. या उपायांमध्ये बेसनाचाही समावेश आहे. अनेक स्त्रिया चेहऱ्यावर बेसनाचा वापर करतात. बेसनाचे पीठ आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी चेहऱ्यासाठीही बेसन उपयुक्त आहे.

बेसनामध्ये अनेक गोष्टी मिसळून त्वचेवर लावता येतात. पण, काही गोष्टी बेसनामध्ये मिसळू नयेत. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगत आहोत, जे बेसनाच्या पिठात मिसळून चेहऱ्यावर लावू नये. बेसनाच्या पिठात या गोष्टी मिसळून वापरल्यास त्वचेला नुकसान होऊ शकते.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा बेसनामध्ये मिसळून त्वचेला लावू नये. बेकिंग सोडा बेसनासोबत वापरल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय बेकिंग सोडा बेसनासोबत वापरू नये.

Skin Care Tips
Monsoon Skin Care : पावसाळ्यात सनस्क्रीन लावताय? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, कारण...

मुलतानी माती

मुलतानी मातीमध्ये अनेक गुणधर्म आहेत आणि ते त्वचेसाठी देखील खूप उपयुक्त आहे. मुलतानी माती हा चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे, तर मुलतानी माती चेहऱ्यावर चमक आणण्याचे काम करते. पण, बेसनासोबत मुलतानी मातीचा वापर करू नये. बेसनासोबत मुलतानी मातीचा वापर केल्यास कोरडेपणा येऊ शकतो. यासाठी बेसनासोबत मुलतानी माती वापरू नका.

अशा प्रकारे बेसनाचा वापर करा

बेसनासोबत तुम्ही हळद, गुलाबपाणी, लिंबाचा रस आणि दही वापरू शकता. बेसनामध्ये या गोष्टी वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Shabda kode:

Related Stories

No stories found.