कामाची जागा (Work Place) म्हणजेच जिथे आपण दिवसाचा सर्वाधिक वेळ घालवतो त्या ठिकाणी आपले व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी ठरते. कामाच्या ठिकाणी आपण कसं वागतो किंवा बोलतो, याचा परिणाम थेट आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो.
कामाच्या ठिकाणी अनेक लोक अव्यावसायिकपणे (Unprofessional) वागतात. त्यातील खालील बाबी ज्या कामाच्या ठिकाणी करणे टाळा. (avoid these unprofessional things to do at a workplace)
वैयक्तिक समस्या कधीही शेअर करू नका.
कामाच्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक समस्या कधीही आणू नका. हि खुप वाईट सवय असून हे अव्यावसायिकपणाचे लक्षण आहे. तुमचे सहकाऱ्यांना तुमच्या वैयक्तिक गोष्टी ऐकूण कंटाळा तर येणारच पण सोबतच कार्यालयात तुमच्याबद्दल अफवा पसरण्याची सुद्धा शक्यता आहे. ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होऊ शकतो.
कामात नेहमी वक्तशीर रहा
कामात कधीही वक्तशीर न राहणे हे अव्यावसायिकपणाचे लक्षण आहे. कामावर वेळेत न पोहोचणे, यामुळे तुम्ही अत्यंत अव्यावसायिक दिसू शकता. जेव्हा एखादी व्यक्ती कामाच्या ठिकाणी अत्यंत वक्तशीर असते तेव्हा त्यांच व्यक्तिमत्त्व नेहमीच प्रशंसनीय असतं. कामाच्या ठिकाणी 5 मिनिटे आधी येणे नेहमीच कौतुकास्पद असते.
उद्धटपणे वागू नका
कामाच्या ठिकाणी उद्धटपणे वागण्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परीणाम पडू शकतो. इतरांसमोर आपली भूमिका ठेवताना कायम तुम्हाला नम्र आणि ग्राउंड लेव्हलला असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर सतत बढाई मारत राहिल्यास तुमचे सहकारी तुम्हाला गृहीत धरायला लागतील,ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम पडेल.
अॅक्टीव सहकारी असणे
कामाच्या ठिकाणी अॅक्टीव टीम सहकारी असणे हे एक अतिशय आवश्यक कौशल्य आहे. प्रत्येक कंपनी अशा कर्मचाऱ्याच्या शोधात असते, जो कोणत्याही परिस्थितीत टीमशी जुळवून घेत काम करतो आणि इतर लोकांशी प्रभावीपणे समन्वय साधू शकतो. त्यामुळे टीमसोबत जुळवून घेऊन काम करणे, हे सकारात्मक व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे.
ऑफिसचे डेस्कवर स्वच्छता राखणे
ऑफिसचे डेस्कवर पसारा करून ठेवणे, हे अव्यावसायिकपणाचे लक्षण आहे. खरं तर, तुमचा डेस्क स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे, ही तुमची जबाबदारी असते. तुमच्या डेस्कवरची स्वच्छता तुमच्या कामावर अधिक प्रभाव टाकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.