Healthy Life: बदलती जीवनशैली अन् व्यायामाकडे दुर्लक्ष केल्याने देशभरातील निम्म्याहून अधिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Healthy Life: नोकरी व शिक्षणानिमित्त होणारी धावपळ, बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढलेला वापर आणि व्यायामाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे देशातील निम्म्याहून अधिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Healthy Life:
Healthy Life: Sakal
Updated on

Healthy Life: नोकरी व शिक्षणानिमित्त होणारी धावपळ, बदलती जीवनशैली, मोबाईलचा वाढलेला वापर आणि व्यायामाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे देशातील निम्म्याहून अधिक लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

देशातील जवळपास ५० टक्के नागरिक इतके आळशी झाले आहेत की, ते किमान पुरेसा व्यायामही करत नाही. लोकांचा आळस असाच कायम राहिल्यास २०३० पर्यंत देशातील ६० टक्के लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याचा इशारा लॅन्सेटने नुकत्याच जारी केलेल्या अहवालात देण्यात आला आहे.

जगभरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी संशोधकांनी १९५ देशांमध्ये २००० ते २०२२ मध्ये झालेल्या विविध सर्वेक्षणांचा अभ्यास केला. त्यावरून १८ वर्षांवरील प्रौढांचे आरोग्य, त्यांच्या भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या, त्यामागील कारणांचा आढावा घेतला. त्यानुसार किमान व्यायाम न करणाऱ्या १९५ देशांमध्ये भारताचा १२ वा क्रमांक लागत असल्याचे म्हटले आहे.

भारतीयांचा वाढता आळस

वर्ष पुरुष महिला सरासरी

२००० १९.६% २५.०% २२.३%

२०१० २८.९% ३८.७% ३३.८%

२०२२ ४२.०% ५७.२% ४९.६%

२०३० ५१.२% ६८.३% ५९.७%

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी अधिक फिट

भारत ४९.६%

पाकिस्तान ४५.७%

चीन २३.८%

अफगाणिस्तान ३३.४%

बांगलादेश २०.३%

Healthy Life:
Shravan Special Recipe: पहिल्या श्रावणी सोमवारी बनवा उपवासाचा बटाटा पराठा , जाणून घ्या रेसिपी

किती व्यायाम करायला हवा?

दररोज - २१ मिनिटे

आठवड्याला - २.५ तास

शारीरिक हालचाली का घटल्या?

  • मोबाईलचा वाढता वापर

  • बैठे काम करण्याचे वाढलेले प्रमाण

  • कोरोनानंतर वाढलेला आळस

  • कष्टाचे काम करण्याचा कंटाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.