Bail Pola 2023 : एखादा माणूस करू शकत नाही ते माझ्यासाठी भारतनं केलंय. या बैलानं मला नवं आयुष्य दिलं. नुसतं दिलं नाही तर ते चांगल्या मार्गानं जगायला शिकवलं, हे उद्गार आहेत बैलगाडा मालक किरणआप्पा यांचे.
आज बैलपोळा आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात श्रावणातील आमावस्येला बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. आजच्या या विशेष दिवशी आपण एका अशा बैलाविषयी जाणून घेणार आहोत. ज्याने त्याच्या मालकाचे जगण खरचं ‘सुंदर’ केलं आहे.
सांगलीतल्या कडेगाव येथील शाळगावातील किरण अप्पा यांचा भारत बैल राज्यभर प्रसिद्ध आहे. मांगडे तात्या यांचा सुंदर बरोबर त्याची जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच भारतने त्यांचे मालक किरण आप्पा यांचे आयुष्य कसे पालटले हे आपण जाणून घेणार आहोत.
किरण आप्पा यांच्याकडे शर्यतीसाठीचे बैल अनेक आहेत. त्यांच्याकडे म्हैसुर जातीचा वजीर, योगी, सात लाख रूपयाचा लक्ष्या, साडेतीनशे फायनल घेतलेला बैलही त्यांच्या दावणीला आहे. सध्या त्यांच्याकडे ७ ते ८ बैल आहेत. जे कोणते ना कोणते मैदान राखतच आहेत.
कसा आहे भारत
किरण आप्पांचे आयुष्य बदलणाऱ्या भारत या बैलाची शिरीरयष्टी मजबूत अन् पिळदार आहे. त्यांच्या मांड्या, कट्स एखाद्या चपळ घोड्यासारखे आहेत. विशेष म्हणजे या बैलाला गळवंड नाहीच. असा हा रेखीव भारत सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बनला आहे.
असं कोणतंही मैदान नाही की जिथं भारतने गुलाल घेतला नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात बरेच बदल झाले. माझ्यात १०० टक्के सुधारणा झाली, हा बैल माझ्या जीवनात येणं याला मी टर्निंग पॉईंट समजतो, तो नसता तर मी कदाचित वाईट परिस्थितीत पोहोचलो असतो, पण भारत आयुष्यात आला अन् मी बरीच सुधारणा केली, माझी आर्थिक स्थिती सुधारली, असे किरण आप्पा अभिमानाने सांगतात. (Bail Pola 2023)
एका महिन्याला भारतला १५ हजार खर्च येतो. आम्ही भारतला कुटुंबातील व्यक्तीच मानला आहे. त्यामुळे त्याच्यावर खर्च करणं हे धाकट्या भावावर खर्च करण्यासारखं आहे. माझ्या वाईट काळात त्याने माझ्यासाठी खूप केलंय ते मी कधीच विसरू शकत नाही.
किरणाअप्पांची पत्नीची प्रसुती झाली अन् हॉस्पिटलचं बिल भागवण्यासाठी भारतने धाकट्या भावासारखी मदत केली. मुलगा होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या काळात मला भारतने जिंकलेल्या रकमेतूनच मी हॉस्पिटलच बिल भागवले, अशी माहितीही किरण आप्पांनी दिली.
भारतला दुखापत झाली तेव्हा...
शर्यतीवेळी झालेल्या दुखापतीमुळे बैल पळू शकत नव्हता. तेव्हा किरणआप्पांनी बैलाला चार दिवसात उभा केला.
केला. घरातल्या व्यक्तीच्या पायाला दुखापत झाल्याप्रमाणे बैलाला औषधोपचार आणि जाणकार व्यक्तीकडून चोळूनही घेतले. त्यानंतर बैलाने पंधराव्या दिवशी मैदान मारलं आणि पहिला नंबर काढला. (Festival)
भारत- सुंदरची गाजलेली जोडी
शर्यतीच्या मैदानात एखादी जोडी प्रसिद्ध झाली ती भारत-सुंदरचीच. लोक ही जोडी कशी पळतेय हे पहायला मैदानात येतात. आख्ख्या गावाचं ‘भारत’ वर प्रेम आहे.
बैलाने तुमच्यासाठी सुस्साट पळावं, मैदान गाजवावं असं वाटत असेल तर, तुम्हीही त्यांच्यासाठी केलं पाहिजे. केवळ खुराक अन् खायला घातलं म्हणजे झालं असं नाही. तर, बैलाला जीव लावा तो तुमच्यासाठी जीव द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही, हेच किरणआप्पांच्या अनुभवांतून वाटतं. (Shravan 2023)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.