Bail Pola 2023 : साताऱ्यातील खटाव जवळ असलेल्या औंध गावाच्या पायथ्याशी एक वाघीण राहते. होय वाघीणत. तिचं नाव आहे मयुरी शिवाजी रणदिवे. या १७ वर्षाच्या तरूणीने अशी कामगिरी केलीय की तुम्ही विचारच करू शकत नाही.
बैलगाडी शर्यत पाहणं आणि स्वत: बैलाची दावणं धरणं यात जमिन आसमानाचं अंतर आहे. हेच अंतर या छोट्याशा गावातल्या मयुरीने भरून काढलं आहे. मयुरी बैलगाडीवर स्वार होऊन पुरूषांच्या बरोबरीने मैदान मारते.
मयुरी सध्या अकरावीत असून ती कॉमर्स शाखेचे शिक्षण घेत आहे. ती सनी,PUBG आणि बबन या बैलांचे सारथ्य अगदी सुरेख करते. मुलीला या क्षेत्रात घातलं याबद्दल तिच्या आई वडिलांनाही समाजाने अनेकवेळा ऐकवलं आहे.
मयुरीची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मयुरीला दोन मोठ्या बहिणी एक भाऊ अशी तीन भावंड आहेत. त्यामुळे खर्चाची घडी बसवनाता आर्थिक ओढातान होते. त्यावरही मयुरी आई-वडिलांना पाठबळ देत आहे.
मुलीने नाव कमावलंय याचं समाधान मला शब्दात सांगता येत नाही. आम्हाला लोकांनी टोमणे मारले, पण आम्ही दोघांनीही मयुरीला प्रोत्साहन दिले. घरची परिस्थिती गरीब असल्याने आम्ही मयुरीला बैल घेण्याची, ते सांभाळण्याची परिस्थिती नाही असे सांगितले.
पण त्यावर मयुरी आम्हाला म्हणाली की, तुम्ही काळजी करू नका, आपण सगळे मेहनत करू, मीही तुम्हाला हातभार लावते, तिच्या या पाठिंब्यामुळेच आम्ही मयुरीला होकार दिला, असे तिच्या आईने सांगितले.
मयुरीची जिद्दच तिच्या यशाचे गुपित आहे
मुलीला हे काम जमेल, ते नाही हे आपणच ठरवलं आहे. या बंधनात समाज मुलींना अडकवतो. जरी घरच्यांनी मुलीला परवानगी दिली तरी बाहेरचे लोक बोलतच राहतात. आणि त्यामुळेच कुटुंबातील लोकही मुलीला एखादं काम करण्यापासून रोखतात.
पण, मयुरी वेगळी आहे. मयुरीची बैलांप्रती असलेली आस्था अन् तिची जिद्द हेच तिच्या यशाचं गुपित असल्याचं तिच्या आई- वडिलांचं म्हणणं आहे.
मयुरी तशी अंगकाठीने बारीक आहे पण एकदा का तिने दावण हातात धरली की तिला स्वत:चच भान राहत नाही. मयुरीने आजवर तीनवेळा मैदानात गाडी उतरवली आहे. पहिल्यांदा तिने साताऱ्यातील पारगावात बैलगाडी उतरवली होती. ती सध्या पहिली महिला बैलगाडा चालक म्हणून नावारूपास येत आहे. (Bail Pola 2023)
PUBGला लागलाय मयुरीचा लळा
मयुरीच्या घरी पुर्वी दोन बैलजोड्या होत्या. त्यानंतर बैलगाडा शर्यंतीवर बंदी आणली. त्यानंतर कुटुंबियांनी चारही बैल ६० हजारात विकलीत. त्यानंतर घरच्यांच्या मागे लागून मयुरीने बैल घ्यायला लावले. सध्या तिच्या दावणीला बबन, सनी, PUBG ही बैले आहेत. PUBGला तिचा लळा आहे. तिच्या मांडीवर डोक ठेऊन तो झोपतो. मयुरीही त्याला कुरवाळत बसते.
मयुरीला बैलगाडीचा नाद असला तरी ती नृत्य, वकृत्व अभ्यासातही हुशार आहे. मयुरीला अभिनयाचीही आवड आहे. शरीरात डेरींग असलं की ते कुठही वापरता येतं, त्यामुळेच मी हे करू शकले असं मयुरी म्हणते.
बैलांना जुंपणे, बैल मैदानात सुटी करणे आणि गाडी पळवणे हे सगळेच मयुरीच्या वडिलांनी शिकवलं. खऱ्या अर्थाने बैलांची खाण्या-पिण्याची काळजी घरातील महिलाच घेतात. मग त्यांनीही बैलगाडा शर्यतीत पुढाकार घ्यावा,असेही मयुरी सांगते. (Shravan 2023)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.