Bail Pola 2023 : बैलगाडा शर्यतीतला ‘हुकमी एक्का’; विलासराव देशमुखांना आवडलेला ‘प्रधान’

प्रधानने अनेक मैदाने गाजवलीत
Bail Pola 2023
Bail Pola 2023esakal
Updated on

Bail Pola 2023 : उद्या बैलपोळा आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा होय. आपल्या संस्कृतीत या सणाला महत्त्वाचे स्थान आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळेच प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात अगदी थाटात बैलगाडी उभी असते.  

शेतीची कामे सोपी करणारा शेतकऱ्याचा मित्र बैलाला पोळ्यादिवशी छान सजवलं जातं, त्याची पूजा केली जाते, त्याला गोडा-धोडाचं जेवण दिलं जातं. काही ठिकाणी बैलांची मिरवणूकही निघते.

आधी शेतकऱ्यांपुरताच मर्यादीत असलेला बैल आता प्रत्येकाच्या मोबाईलवर दिसतो. याचे कारण म्हणजे बैलगाडा शर्यंतीची वाढलेली क्रेझ होय. आज आपण अशा एका बैलाची माहिती घेऊयात  ज्याचे कौतुक तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनीही केलं होतं. 

Bail Pola 2023
Bail Pola 2022: पोळा स्पेशल ताकाची कढी कशी तयार करतात?

पुण्यातल्या माळशिरसमधील आण्णा काळे यांचा प्रधान बैल राजकीय आखाड्यातही चर्चेत होता. १९९४ मध्ये नावाजलेला बैल म्हणून प्रधानची ख्याती होती. त्यावेळी गाजणाऱ्या पतंग, बॅटरी अशा नामवंत बैलांसोबत मैदान गाजवणाऱ्या बैलांसोबत प्रधानही होता. काळे कुटुंबियांनी बैल घेतला तेव्हा त्याची किंमत तब्बल १ लाख एकशे आकरा रूपयांना होती.

धनगरी खिलार जातीच्या या बैलाने काळे कुटुंबात आल्यानंतर १२ व्या दिवशीच प्रधानने काळे कुटुंबियांना शर्यत जिंकून दिली. त्यानंतर हा बक्षिसांचा ओघ सुरूच झाला. काळे कुटुंबियांच्या सर्वच सदस्यांचा तो लाडका होता.

आण्णा काळेंचा हुकमी एक्का

आण्णा काळे यांची बैलगाडा शर्यतीची परंपरा आजही जोपासली आहे. आजही जेव्हा त्यांचे बैल शर्यतीला जातात. तेव्हा ‘माळशिरस तालुक्यातील आण्णा काळे यांचा एक हुकमी एक्का होऊन गेला, तो म्हणजे प्रधान होय, अशी ओळख सांगितली जाते.  (Bullock cart)

Bail Pola 2023
Bail Pola : पोळ्याला दिला जातो वळूसह मातीच्या बैलाला मान

मी जेव्हा प्रधानचे सारथ्य करत होतो. तेव्हा त्यानेही मला साथ दिली. कधी कधी चिडीचा डाव व्हायचा तेव्हा बैलांना पुन्हा पळवावं लागत होतं. तेव्हा कधीही प्रधान थकलाय, किंवा तो चिडलाय, पट्टी सोडून पळलाय असं कधीही केलं नाही. दावन धरली तो नेहमी त्याच तोऱ्यात उभा असायचा, असे प्रधानला पळवणारे बैलगाडा चालकांनी सांगितले.

मुंबईला शर्यत होती अन् तेव्हा प्रधान जिंतीच्या सोन्यासोबत पळालेला होता. माळा-मोत्याची जोडी बैलगाडी शर्यतीच्या टॉपला होती. त्यावेळी प्रधानला तिथं नेलं अन् माळा मोत्यापुढं आपला टिकाव लागणार नाही म्हणून ही आण्णा काळे यांनी बैलजोडी मैदानात उतरवलीच नाही.

तेव्हा विलासराव देशमुख म्हणाले की, शर्यत तर व्हायलाच पाहिजे. आम्ही तुम्हाला पारितोषिक देणार पण आम्हाला प्रधानला पळताना पहायचंय.तेव्हा काळेंचीच एक जोडी पळली. मुख्यमंत्री स्वत: आपली बैलजोडी पळताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत हे पाहुन आण्णा काळे भारावले.

त्यांनीही विलासराव देशमुखांच्या शब्दांचा मान राखत बैलजोडी बैलजोडी मैदानात उतरवली. प्रधान अन् सोन्याला पळताना पाहुन ‘बैलगाडा मैदानातील बादशहा’असेच प्रधानला म्हटले गेले.  (Vilasrao Deshmukh)

Bail Pola 2023
Bail Pola 2023: यंदा पोळा सणावर महागाईचे सावट! सजावटीच्या वस्तूंच्या दरात 30 टक्के वाढ

प्रधानने अनेक मैदाने गाजवली

या बैलाने महाराष्ट्रातील प्रत्येक मैदानावर, प्रत्येक मैदानाचा मानकरी होण्याचा बहुमान पटकवला आहे. पुसेगाव ,कोरेगाव, पेडगाव, साठेवाडी, दिवड अशा ठिकाणी प्रधान मानकरी झाला आहे. प्रधान हा,जिंतीच्या सोन्या, पुसेगाव चा सुंदर अशा बैलांबरोबर पळाला आणि अनेक मैदानांचा मानकरी झाला.

प्रधानचा मृत्यू २००४ मध्ये झाला. इतकी  वर्ष लोटूनही या बैलाची आठवण काळे कुटुंबियांना अन् प्रधानला पळताना पाहिलेल्या प्रत्येक बैलगाडा शर्यतीच्या चाहत्याला होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.