Madhuri Dixit Nene Recipe Of Kanda Bhaji In Marathi : पावसाळा म्हटलं की, पहिले आठवतात ते कांदा भजी आणि मसाला चहा. याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितही अपवाद नाही. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी माधुरी चक्क पती आणि मुलासोबत मस्त गप्पा मारत मुलासहित चाहत्यांनाही कांदा भजी बनवण्याचे ५ प्रकार शिकवत आहे.
सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पती डॉ. श्रीराम नेने यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी हा व्हिडीओ अपलोड केलेले असून माधुरी आणि डॉ. नेने दोघांच्याही इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चला तर जाणून घेऊया माधुरी दीक्षितकडून ऑईल फ्री कांदा भजीची रेसिपी.
यात माधुरीच्या फॅमिलीचे क्युट बाँडिंगही चाहत्यांना बघायला मिळत आहे. मुलाला भजी आणि चहा बनवायला शिकवताना ती दिसत आहे. त्यात पतीचाही तेवढाच उत्साहाने सहभाग हे देखणं उदाहरणही यानिमित्ताने माधुरीने चाहत्यांसमोर ठेवलं आहे.
यात डीप फ्राय, शॅलो फ्राय, पॅनको, एअर फ्राय आणि बेक्ड अशा पाच प्रकारे कांदा भजी बनवले असून सोबत मस्त मसाला चहा बनवला आहे.
माधुरी दीक्षित स्पेशल कांदा भजी
साहित्य
२ कांदे, २/३ कप बेसन, २ चमचे तांदळाचे पिठ, १/२ टीस्पून किसलेले आले, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १ चिमूट बेकींग सोडा, १ टीस्पून, २-३ चमचे पाणी.
कृती-
एका भांड्यात चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, आले आणि हिरवी मिरची घालून पीठ तयार करा.
बॅटर तयार झाल्यावर त्यात बेकींग सोडा आणि थोडे तेल घाला. सगळं नीट मिक्स करा.
आवश्यक असल्यास आपण त्यात पाणी मिक्स करू शकतात.
बॅटर तयार झाल्यावर भजी बेक करा, डीप फ्राय करा, एअर फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करूनही खाऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.