नीता दोंदे
मला आईपणाची चाहूल लागली, त्यावेळी मी पूर्ण वेळ नोकरी करत होते. ऑपरेशन्स मॅनेजर या मोठ्या पदावर मी कार्यरत होते. त्या काळात मी अभिनय क्षेत्रामध्ये नव्हते. नवीन लग्न झाल्यानंतर माझा जॉब सुरू होता. त्याचदरम्यान मला आईपणाची चाहूल लागली. त्यामुळे मी खूप आनंदात होते. विशेष म्हणजे त्यावेळी मला करिअरमध्ये कोणतीही तडतोड करावी लागली नाही. कारण, माझ्या पतीसह सासू-सासरे यांचे भक्कम पाठबळ मला मिळाले होते. मात्र, नोकरी करणं आणि आपल्या शरीराची काळजी घेणं, यासाठी मला प्रयत्न करावे लागले. माझी आई आणि माझ्या सासूबाई यांनी माझी खूप काळजी घेतली. विशेष म्हणजे त्या काळात माझं पहिलं प्राधान्य माझ्या बाळासाठीच होतं.