Bathing Tips: अंघोळीच्या पाण्यात मिसळा या गोष्टी, अंगदूखी फटक्यात दूर होईल अन् रोज होईल हेल्थी बाथ थेरपी

Healthy Bath : आपल्या शरीराला रिलॅक्स होण्याची गरज असते. आणि तुम्ही रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर शरीर रिलॅक्स होतं असं वाटत असेल. तर तसं नाहीये या सततच्या अंग दुखीवर तुम्ही एक उपाय करू शकता.
healthy bath
healthy bath esakal
Updated on

Bathing Tips: 

कामाच्या गडबडीत आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. आपल्याला होणाऱ्या वेदना अंगदुखी पाठ दुखी यांकडे आपण दुर्लक्ष करतो. आठवडाभर जेव्हा तुम्ही धावपळ करत ट्रेन पकडत ऑफिसला जाता, तेव्हा आपल्याला अंग दुखी होते. सतत लॅपटॉप समोर बसून खांदे दुखू शकतात पण आपण याकडे लक्ष देत नाही.

सुट्टीच्या दिवशी वेळ काढून त्याच्यावर उपचारही करत नही. अंगदुखी रोज होणार आहे त्यामुळे तिच्यावर किरकोळ उपचार करून चालणार नाहीत. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत. जो तुम्ही रोजच्या रोज करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज आराम मिळू शकतो.

healthy bath
Bathing Tips: आंघोळ करताना तम्हीही या चुका करता का? अन्यथा त्वचेचं होऊ शकतं मोठं नुकसान

आपल्या शरीराला रिलॅक्स होण्याची गरज असते .आणि तुम्ही रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर शरीर रिलॅक्स होतं, असं वाटत असेल तर तसं नाहीये. या सततच्या अंग दुखीवर तुम्ही एक उपाय करू शकता.

तुम्ही दररोज आंघोळ करता, त्यामुळे थोडासा थकवा निघून जातो. आंघोळीच्या पाण्यात तुम्ही काही गोष्टी मिसळल्या तर तुम्हाला या अंगदुखीच्या दुखण्यापासून कायमची सुटका मिळू शकते. कोणत्या वस्तू आहेत हे जाणून घेऊ.

healthy bath
Bathing Tips: अंघोळीच्या पाण्यात या पाच गोष्टी मिक्स करा; दिवसभर राहाल अगदी फ्रेश

पेपरमिंट ऑइल

तुम्ही आंघोळीच्या पाण्यात पेपरमिंट ऑइल मिसळलं. तर तुम्हाला अंगदुखीपासून आराम मिळू शकतो. या पाण्याने अंघोळ केल्याने तुमच्या शरीरातील थकवा निघून जाऊ शकतो. शरीर रिलॅक्स होऊ शकतं.

जर तुम्हाला या तेलापासून काही एलर्जी असेल तर हे वापरू नका. पण याचा फायदा हा डोकेदुखी आणि मायक्रोन सारख्या आजारावर होतो. त्यामुळे आजपासूनच आंघोळीच्या पाण्यात हे तेल टाकून आंघोळ करा.

गुलाब जल

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कप मधून घामाचा वास जास्त येतो. कारण या दिवसात आपल्याला जास्त घाम येतो. तसेच आपण भिजल्यामुळे कपडे आणि अंगाचा वास मिक्स होतो. त्यामुळे एक उग्र वास आपल्या शरीराला येत असतो. तो दूर करण्यासाठी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गुलाब जल टाकू शकता. यामुळे शरीर सुद्धा रिलॅक्स होईल.

healthy bath
Holi Festival : होळी खेळल्यानंतर अशी आंघोळ कधी केलीय का ? नसेल केली तर यावर्षी करा

हळद

तुम्हाला त्वचेचा कुठला संसर्ग असेल किंवा एखाद्या एलर्जी उठली असेल. तर अंघोळीच्या पाण्यात हळद मिक्स करा पंधरा मिनिटे पाणी तसेच ठेवून राहू द्या. आणि त्यानंतर आंघोळ करा त्यामुळे तुमच्या त्वचेचे सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील. शरीरातील थकवाही दूर होईल. फक्त या पाण्याने अंघोळ केल्यानंतर पुन्हा साध्या पाण्याने अंघोळ करा म्हणजे पूर्णपणे हळदीने होऊन जाईल.

healthy bath
Parenting Tips : हातातून बाळ निसटेल म्हणून भीती वाटते? बाळाला अशी घाला अंघोळ!

लिंबाचे तेल

पूर्वी कुठल्याही प्रकारच्या एलर्जी झाली किंवा वारफोड्या उठल्या तर लिंबाचा पाला उकळून त्या पाण्याने मुलांना आंघोळ घातली जायची. लहान मुलांसाठी सुद्धा लिंबाचं पाणी चांगलं असतं. जर तुम्हालाही याचे फायदे हवे असतील. तर अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा पाला उकळा. आणि त्या पाण्याने अंघोळ करा. त्याने तुम्हाला अनेक फायदे दिसतील.

healthy bath
Diwali Bath Mistakes : अभ्यंगस्नानावेळी करू नका 'या' चूका; पडाल वर्षभर आजारी!

मोठं मीठ

एखादी जखम झाल्यानंतर किंवा पाय मुरगळला असेल किंवा सुजला असेल तर मिठाच्या पाण्याने शेकण्यास सांगितले जाते. शरीरावरची सूज उतरते असे म्हणतात. जर तुमच्या शरीरातील थकवा निघून गेला नसेल तर तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ करा यामुळे शरीरातील वेदना नाहीशी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.