Beard Growth Tips : रूबाबदार दिसण्यासाठी दाढीही असणे महत्त्वाचे; पण काही केल्या दाढी वाढेना, या उपायांनी फरक जाणवेल

Beard Growth Home Remedies :काही लोक दाढी वेळेवर न वाढणे हे कमी टेस्टोस्टेरॉनचे लक्षण मानतात. असे होत नसले तरी ते काहीवेळा तुमच्या अनुवांशिकतेवरही अवलंबून असते.
Beard Growth Tips
Beard Growth Tipsesakal
Updated on

Beard Growth Tips :    

महिलांप्रमाणेच प्रत्येक पुरूषालाही सुंदर दिसण्याचा अधिकार आहे. सध्या पुरूषांच्या रफ स्कीन, हेअर प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागत आहे. त्यातही दाढी न वाढणे, किंवा चेहऱ्यावर अर्धवट दाढी वाढण्याचे प्रकार वाढले आहेत.

काहींच्या चेहऱ्यावर दाढी एखाद्या घनदाट जंगलाप्रमाणे वाढते, तर काहींची विरळ असते. दाढी येण्यासाठी अनेक तरुण वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. जो कोणी सांगेल तो उपाय करण्यासाठी हे तरुण तयार असतात पण बरेच उपाय निकामी ठरतात. पण तुम्हाला माहितीय का दाढी वाढविण्यासाठी घरातच काही उपाय आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही दाढी वाढवू शकता. (Beard Growth Tips)

Beard Growth Tips
Lok Sabha Election: ऐकावं ते नवलच! उमेदवारानं प्रचारासाठी हाती घेतला वस्तरा! म्हणाला, दाढी करतो मत द्या...

वयाच्या २५ वर्षापर्यंत दाढी वाढणे ही एक सामान्य प्रक्रिया मानली जाते. या काळात तुमची दाढी वाढत नसेल तर काळजी करण्यासारखे काही नाही. काही लोक दाढी वेळेवर न वाढणे हे कमी टेस्टोस्टेरॉनचे लक्षण मानतात. असे होत नसले तरी ते काहीवेळा तुमच्या अनुवांशिकतेवरही अवलंबून असते. काहीवेळा दाढीची वाढ योग्य प्रकारे न होण्यामागे इतर कारणे असू शकतात.

दाढीची वाढ न होण्याची कारणे

  • अनुवंशिकता

  • व्यसन करणे

  • पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स न घेणे

  • ताण-तणाव

Beard Growth Tips
Nashik News : आरक्षण मिळेपर्यंत दाढी- कटिंग न करण्याची प्रतिज्ञा; शरद नवले 6 महिन्यानंतरही ठाम

आहारात करा हे बदल

ज्याप्रकारे डोक्यावरील केसांची वाढ होण्यासाठी प्रोटिनची गरज असते अगदी त्याच प्रमाणे दाढीच्या केसांनादेखील प्रोटीनची गरज असते. त्यासाठी तुमच्या आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. तुमच्या आहारात मांस, मासे, अंडी, डेअर प्रोडक्ट आणि फळांचा समावेश करा. तसेच, तुम्ही दाढीच्या केसांना अंडे आणि दही लावू शकता.  

Beard Growth Tips
Monsoon Men Fashion Tips : पावसाळ्यात स्टायलिश दिसायचंय तर 'हे' नक्की ट्राय करा

लसूण वापरा

तुम्हाला जर दाढी खुपच कमी येत असेल तर लसुण यावर रामबाण उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही दाढी येण्याच्या भागावर लसून चोळा. असे एक महिना केल्याने, तुम्हाला फरक जाणवेल.

Beard Growth Tips
पांढरी दाढी... डोळ्यावर गॉगल; पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी वेशांतर करून आला MS धोनी? मीम्स Viral

नारळाचे तेल

नारळाचे तेल केसांसाठी वरदान मानले जाते. नारळामध्ये विटामिन ई आणि फॅटी अॅसिड केस वाढवण्यासाठी पोषण देते. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. जर तुम्हाला तुमच्या दाढीच्या केसांची वाढ करायची असेल तर तुम्ही नाराळाच्या तेलाचा उपयोग करु शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी दाढीला नाराळाचे तेल लावून मसाज करा.

Beard Growth Tips
Nashik News : बोटावरची शाई दाखवा अन् मोफत दाढी, किंवा हेड मसाज करा! सलून चालकानं लाढवली अनोखी शक्कल

बदाम तेल

बदाम तेलात विटामिन ई असते. यामध्ये अँटीऑक्सीडेंट सारखे पोषण मिळते. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच तुम्ही रोज सकाळी बदामाचे सेवन करा. तसेच, दाढी वाढवण्यासाठी चेहऱ्याला तेल लावा. हे तुम्हाला खुप फायद्याचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.