Beauty Tips: अनेकदा बॉलीवुड सेलिब्रिटींना बघून तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील. त्यांच्या एवढ्या सुंदर आणि ग्लोईंग स्किनचं सीक्रेट काय असू शकतं बरं असाही प्रश्न अनेकदा तुम्हाला महिलांना किंवा तरूणींना पडतच असेल. कायम चित्रपटाच्या शुटींगमध्ये बिझी असूनही या अभिनेत्रींच्या सुंदर आणि ग्लोईंग स्किनमागे काही सिंपल टीप्स आहे. चला तर जाणून घेऊया सेलिब्रिटी ब्युटी टीप्स.
प्रत्येक बॉलीवुड अभिनेत्री त्यांच्या फावल्या वेळात चेहऱ्यासाठी काहीना काही घरघुती उपाय करतच असतात. त्यांच्या ब्युटी रिजीमसाठी त्या थोडा तरी वेळ काढतातच. तुम्हालाही तुमची त्वचा टवटवीत ठेवायची असेल तर फॉलो करा सेलिब्रिटींच्या ब्युटी केअर टीप्स.
अनुष्का शर्मा चेहऱ्याला लावते हे फेस मास्क
अनुष्का शर्माची त्वचा बघून कुठल्याही तरूणीला हेवा वाटावा अशी ती आहे. तीदेखील खास ब्युटी रिजीम फॉलो करते. ती तिच्या त्वचेला योग्य प्रकारे क्लिंझ करते. त्यासोबतच नीम फेसवॉश लावते. ज्यामुळे तिची त्वचा जंतूविरहित राहाण्यास मदत होते.
आलिया भट चेहऱ्याला लावते ही माती
आलियाची त्वचा फारच सॉफ्ट दिसते. तिचं ब्युटी रिजीम फारच साधं आहे. ती चेहऱ्याला मुलतानी माती लावते. सकाळी उठल्यानंतर डोळ्याखालील सुजन दूर करण्यासाठी ती बर्फाचे तुकडे लावत स्कीनवर रब करत असते.
कतरिना कितीही थकली असेल तरी चेहऱ्यावरचा मेकअप काढण्यास विसरत नाही
अभिनेत्री कतरिना कितीही थकली असली तरी चेहऱ्यावरचा मेकअप रिमूव्ह करण्यास विसरत नाही. रात्री झोपण्यापूर्वी ती क्लिनींग आणि मेकअप रिमूव्ह आठवणीने करत असते. त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ती दररोज ६-८ ग्लास पाणी पिते.
करीना कपूर लावते होममेड फेस मास्क
करीना कपूर तिच्या त्वेचेची विशेष काळजी घेते. काही ब्युटी टीप्स ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर करत असते. चंदन, विटॅमिन ई, हळद आणि दूधाचा फेस पॅक ती तिच्या चेहऱ्याला लावत असते. हा फेस पॅक १५-२० मिनिटे तिच्या चेहऱ्यावर असतो. त्याने चेहरा चमकदार दिसतो.
माधुरी दिक्षितची ब्युटी केअर
५४ वर्षाच्या माधुरीच्या स्किन केअरमध्ये क्लिंजर, अल्कोहोल फ्री टोनर, मॉश्चरायझर आमि एसपीएफ या मुख्य चार गोष्टींचा समावेश असतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.