तरुण दिसायचंय? मग आहारात करा या पदार्थांचा समावेश, कायम राहील Skin Glow

त्वचेवर ग्लो टिकून ठेवण्यासाठी तसचं सुरकुत्या दूर करण्यासाठी त्वचेला गरजेचे असलेले सर्व व्हिटॅमिन, मिनरल्स मिळणं आवश्यक आहे. यासाठी आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊयात
त्वचेला ग्लो आणण्यासाठी
त्वचेला ग्लो आणण्यासाठीEsakal
Updated on

कायम तरुण दिसायला कुणाला आवडत नाही. मात्र एकदा वय वाढू लागलं की आपोआपच चेहरा निस्तेज दिसू लागतो. ३० वर्ष उलटून गेली कि चेहऱ्यावरील चमक Face Glow कमी होवू लागते, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा तुमचं वाढतं वय सांगू लागते. Beauty Marathi Tips Know about the food substances to maintain skin glow

अशा वेळी विविध क्रिम, सिरम Serum किंवा ट्रिंटमेंटसोबत किंवा घरगुती स्किन केअर Skin Care रुटीनसोबतच आहारामध्ये बदल करणं गरजेचं असतं. जर तुम्हाला कायम तरुण दिसायचं असेल तर ३० वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला आहारामध्ये Diet काही पदार्थांचा आवर्जुन समावेश करावा लागेल. जेणेकरून तुमच्या त्वचेला आतून पोषण मिळेल आणि तुमची त्वचा तरुण Fresh Skin दिसेल.

त्वचेवर ग्लो टिकून ठेवण्यासाठी तसचं सुरकुत्या दूर करण्यासाठी त्वचेला गरजेचे असलेले सर्व व्हिटॅमिन, मिनरल्स मिळणं आवश्यक आहे. यासाठी आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा हे जाणून घेऊयात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये Green Vegetables मोठ्या प्रमाणात पोषक तत्वं आढळतात. यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, बी-१ आणि व्हिटॅमिन बी २ आढळतात. यामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तसचं चेहऱ्यावर टायटनिंग इफेक्ट दिसू लागतो.

यासाठीच आहारामध्ये पालक, मेथी, चाकवत, माठ यांसारख्या पालेभाज्यांचा समावेश करणं गरजेचं आहे.

पपई

पपईमध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्समुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसंच पपईमध्ये पपाइन नावाचं एंजाइम आढळतं हे अँटीएजिंग म्हणून काम करतं. ज्यामुळे वाढतं वय कमी दिसू लागतं.

पपईमध्ये अँटीइंफ्लेमेटरी म्हणजे दाह विरोधी गुणधर्म आढळतात.

पपईच्या सेवनामुळे डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. आहारामध्ये नियमितपणे पपईचा समावेश केल्यास त्वचेवर ग्लो दिसू लागतो.

हे देखिल वाचा-

त्वचेला ग्लो आणण्यासाठी
Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचंय? मग हे स्किन केअर रुटीन करा फॉलो

नट्स

बदाम, अक्रोड किंवा शेंगदाण्याच्या सेवनाचे त्वचेला अनेक फायदे आहेत. बदाममध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई उपलब्ध असतं. ज्यामुळे डॅमेज झालेले स्किन ट्यूश पुन्हा बरे होण्यास मदत होते. तसंच यामुळे त्वचेचं सुर्याच्या यूव्ही किरणांपासून रक्षण होतं.

याचसोबत काही नट्समध्ये उपलब्ध असलेल्या ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे त्वचेला पुरेसं पोषण मिळतं. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होवून त्वचेवरील ग्लो वाढतो.

बेरीज

स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरीज अशा विविध प्रकारच्या बेरीजमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स तसंच व्हिटॅमिन सी आढळतं. यामुळे सुर्यकिरणामुळे किंवा प्रदूषण आणि घाणीमुळे त्वेचेचं होणारं नुकसान कमी होण्यास मदत होते.

रताळं

भारतात खास करून उपवासासाठी खाल्लं जाणारं रताळं तुमची त्वचा तरुण दिसण्यासाठी उपयुक्त ठरतं. यासाठीच रताळ्याचा नियमित आहारात समावेश करणं गरजेचं आहे. यामध्ये बीटा कॅरेटीन नावाचं अँटीऑक्सिडंट उपलब्ध असून यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.

तसंच रताळ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन र्ईमुळे त्वचेचं फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण होतं.

या पदार्थांसोबत आहारामध्ये विविध फळं, अवाकाडो, ब्रोकोली, लाल सिमला मिरची यांचा समावेश करावा. तसंच दिवसभरात ८-१० लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होतील. त्वचेवर ग्लो येईल आणि त्वचा तरुण दिसू लागेल.

हे देखिल वाचा-

त्वचेला ग्लो आणण्यासाठी
Dry Skin Care Tips : कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी एक्सपर्ट्स सांगतात काही घरगुती उपाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.