टोनरमुळे चेहऱ्यावरील Open Poresची समस्या कमी होऊ शकते का? जाणून घ्या

Open Pores Treatment चेहऱ्यावरील ओपन पोअर्समुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते, पण यावर कोणते उपाय करणे योग्य ठरेल? जाणून घेऊया सविस्तर
open pores on face treatment
open pores on face treatmentSakal
Updated on

त्वचेची देखभाल करण्यासाठी बहुतांश जण कंटाळा करतात आणि मग चेहऱ्यावर नॅचरल ग्लो दिसत नाहीय, म्हणून सतत रडगाणेही गातात. त्वचेच्या समस्या निर्माण होऊ नये; यासाठी क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चराइझिंगचे रूटीन पाळणं अत्यंत आवश्यक आहे. 

चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवा असेल,  त्वचेवरील छिद्रांची (Pores) समस्या कमी करायची असेल तर स्किन केअर रूटीन फॉलो करणं महत्त्वाचं आहे. कारण फेस वॉश, मॉइश्चराइझर आणि टोनरमुळे त्वचेच्या कित्येक समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

पण खरंच टोनरमुळे त्वचेवरील पोअर्स कमी होतात का? चला जाणून घेऊया सविस्तर माहिती…   

open pores on face treatment
सावधान! घाणेरड्या बेडशीटमुळे होऊ शकतात त्वचेच्या गंभीर समस्या, इतक्या दिवसांनी बदलावं अंथरूण

ओपन पोअर्सची समस्या

मुरुम आल्यानंतर बहुतांश जण सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी ब्युटी-पार्लरमध्ये जाऊन ट्रीटमेंट करतात. पार्लर ट्रीटमेंटमध्ये ब्लॅक हेड्स - वाईट हेड्स नीडलच्या मदतीने काढले जातात. याचदरम्यान चेहऱ्यावरील पिंपल्स फोडले जातात, ज्यामुळे ओपन पोअर्सची समस्या निर्माण होते. 

open pores on face treatment
Jawed Habib Tips लांबसडक, घनदाट व मऊ केस हवेत? ट्राय करून पाहा हेअर एक्सपर्ट जावेद हबीबच्या या 5 टिप्स

निसर्गतःच आपल्या त्वचेवर रोमछिद्रे असतात, ज्याद्वारे त्वचेला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. तसंच घामाद्वारे विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात.  पण त्वचेवरील रोमछिंद्रांचा आकार कधी-कधी इतका मोठा होतो की यामुळे सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते.

open pores on face treatment
रोज रात्री नाभीवर ‘या’ तेलाचे काही थेंब लावा, केसगळतीसह कित्येक समस्यांपासून मिळेल सुटका

पण ही समस्या नेमके कोणत्या कारणांमुळे उद्भवते?  

जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या त्वचेतही अनेक बदल होतात.  काहींची त्वचा सैल पडते आणि कोलेजनचे उत्पादन कमी होते, परिणामी छिद्रे वाढतात. तसेच जर त्वचा तेलकट असेल, तर छिद्रे मोठे होतात आणि अधिक ठळकपणे दिसतात. 

छिद्रांचा आकार मोठा झाल्यास यामध्ये दुर्गंध किंवा अधिक प्रमाणात सीबम जमा होते. यामुळे मुरुमांचीही समस्या निर्माण होते. अ‍ॅण्ड्रोजन हार्मोनचा (androgen hormone) स्तर वाढल्यास पुरुषांच्या त्वचेवर नैसर्गिकरित्या तेल अधिक प्रमाणात तयार होते. यामुळे रोमछिद्रांचा आकार वाढतो.   

कोणत्या कारणांमुळे ओपन पोअर्सची समस्या होते निर्माण?

  • सनस्क्रिन न लावताच आपण उन्हाच्या संपर्कात आल्यासही त्वचेतील कोलेजनचे नुकसान होऊ शकते. 

  • धूम्रपान, ऑक्सिडेटिव्ह तणावामुळेही त्वचेवर दुष्परिणाम होतात. 

  • चुकीच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करणे.

टोनरमुळे पोअर्सची समस्या दूर होऊ शकते?

डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य टोनरचा वापर केल्यास त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात. यामुळे त्वचा टाइट होण्यासही मदत मिळते. पण टोनरमुळे चेहऱ्यावर पोअर्सचा आकार कायमस्वरुपी लहान होऊ शकत नाही. 

ओपन पोअर्सची समस्या कशी कमी करावी? 

बर्फाचा वापर करणे : तुम्हाला केमिकलयुक्त ट्रीटमेंट करायची नसल्यास आपण स्किन केअर रूटीनमध्ये बर्फाचा समावेश करू शकता. बर्फाचे तुकडे एका रूमालामध्ये गुंडाळा आणि यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर रूमाल फिरवावा. या प्रक्रियेस आयसिंग असे म्हणतात. यामुळे त्वचा टाइट होईल आणि पोअर्सही लहान दिसतील. 

धूम्रपान करणे टाळा -  शरीर आतील बाजूने निरोगी असेल तर बाह्य सौंदर्यही अधिक खुलते.   ओपन पोअर्सची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी धूम्रपान करणे टाळावे. यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. 

स्किन केअर रूटीन करा फॉलो - त्वचेवर अतिरिक्त तेल व दुर्गंध स्वच्छ करण्यासाठी तसंच त्वचेवरील रोमछिद्रे बंद होऊ नयेत, यासाठी सौम्य स्वरुपातील क्लींझरचा वापर करावा. यामुळे पोअर्स स्वच्छ होतात आणि त्वचेच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत कोणतेही अडथळे निर्माण होत नाही. 

सनस्क्रीनचा वापर नक्की करावा. आपण मेकअप करत असाल तर रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नक्की स्वच्छ करावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्वचेवर कोणतेही प्रयोग करू नये. अन्यथा त्वचेशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.