रस्त्यावरील धुळ,प्रदुषण आपल्या शरीरातील बदल अन् ऊन यामुळे चेहऱ्याची वाट लागते. इतरही कारणांमुळे चेहऱ्याची चमक कमी होऊ लागते. विशेषत: महिलांच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलनामुळे मुरुम आणि डाग चेहऱ्यावर येऊ लागतात. त्वचा चमकदार होण्यासाठी महिला अनेकदा पार्लरमधून महागड्या उपचारांचा आणि सौंदर्य उत्पादनांचा अवलंब करतात.
अशा या ट्रिटमेंटमुळे काही काळ चेहऱ्यावर चमक येते. पण, प्रत्यक्षात त्यांना चेहऱ्याची चमक फार काळ टिकवून ठेवता येत नाही. त्याचबरोबर काही वेळा या रासायनिक उत्पादनांचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम होतो. खूप प्रयत्न करूनही तुमचा चेहरा चमकत नसेल तर काही घरगुती उपायांचा अवलंब केला जातो.
जर तुम्हाला अचानक गरबा खेळायला जायचं असेल.तर, तुम्ही पाच मिनिटात कसे तयार व्हायचे हे पाहुयात. आज आम्ही तुम्हाला एक पटकन होणारा अन् चेहऱ्याला लावल्यानंतर तितकाच इफेक्ट देणारा फेसपॅक पाहणार आहोत.
गव्हाच्या पिठात आढळणारे गुणधर्म चेहऱ्यावर साचलेली घाण काढून टाकतात. यामुळे टॅनिंग दूर होऊन चेहरा उजळतो. हे पीठ नैसर्गिक स्क्रबसारखे काम करते. यामुळे छिद्रांमध्ये साचलेली घाण आणि चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो.
मुरुम किंवा वांग चेहऱ्यावरील डाग आणि डागही गव्हाचे पीठ दूर करते. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतात आणि चेहऱ्यावर चमक येते.
हळदीमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे त्वचेला आतून पोषण देते आणि निस्तेजपणा कमी करते.
गव्हाचे पीठ - ४ टेस्पून
हळद - अर्धा टीस्पून
तूप - १ चमचा
दूध - ४ टेस्पून
हे सर्व पदार्थ मिसळून चांगले एकजीव करा. तुम्ही प्रमाण पाहून दूधाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. या तयार पेस्टने तुमच्या चेहऱ्याला चांगला मसाज करा.
त्यानंतर ५ किंवा ७ मिनिटे पॅक चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे टॅनिंग दूर होईल, डाग कमी होतील आणि चेहरा उजळ होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.