Beauty Tips For Women : तरुण दिसायचंय?मग 'हा' उपाय करून बघाच

हेल्थलाइनच्या मते पांढरे मांस म्हणजेच चिकन आपल्या शरिरात कोलेजनचे उत्पादन वाढविण्याचे काम करते
Beauty Tips For Women
Beauty Tips For Womenesakal
Updated on

Beauty Tips For Women : त्वचा तरुण दिसण्यासाठी आवश्‍यक कोलेजन प्रोटीन महत्वाची भूमिका बजावते. जे त्वचेची रचना टिकवते. पण वय वाढले की त्यांचे उत्पादन कमी होते. यामुळे चेहऱ्याची त्वचा पातळ होऊन सुरकुत्या पडतात. ही प्रक्रिया दरवर्षी वाढते. पण आहारात काही महत्त्वपूर्ण बदल केल्यास कोलेजनचे उत्पादन वाढू शकते. यामुळे त्वचेवर परिणाम होऊन वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

कोलेजनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा

चिकन : हेल्थलाइनच्या मते पांढरे मांस म्हणजेच चिकन आपल्या शरिरात कोलेजनचे उत्पादन वाढविण्याचे काम करते. चिकनमध्ये अशा उती मुबलक प्रमाणात आढळतात जे आहारातील कोलेजनचा समृद्ध स्रोत आहे.

मासे : माशांच्या हाडे आणि अस्थिबंधनांमध्ये कोलेजन मुबलक प्रमाणात आढळते. ते शरीरात सहजपणे शोषले जाते. संशोधनात असेही आढळले की माशांच्या त्वचेत सर्वाधिक कोलेजन आढळते.

Beauty Tips For Women
Beauty Tips : नेलपेंट बाटलीतच कडक होते? ४ उपाय, टिकेल अनेक महिने..!

अंड्याचा पांढरा भाग : अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोलिन मुबलक प्रमाणात कोलेजन आढळते. हे एक प्रकारचे अमिनो अॅसिड आहे, जे कोलेजनचे उत्पादन वाढवण्याचे काम करते. (Beauty Tips)

लिंबूवर्गीय फळे : व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबूवर्गीय फळे देखील प्रोकोलेजनचे उत्पादन वाढविण्यात मदत करतात. यासाठी संत्रा, लिंबू, द्राक्ष या फळांचा आहारात समावेश करावा.

बेरीचा करा समावेश : विविध प्रकारच्या बेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे कोलेजनचे उत्पादन वाढवण्याचे काम करते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात जे त्वचेसाठी चांगले असतात.

लसूण खाणे उत्तम : लसणात सल्फर आढळते जे कोलेजनचे विघटन होण्यास मदत करते. त्यामुळे रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास ते कोलेजनचे उत्पादन वाढवून वृद्धत्वाचा वेग कमी करू शकते. (Lifestyle)

Beauty Tips For Women
Beauty Tips : हातापायांचे सौंदर्य येईल खुलून; वापरा प्युमिक स्टोन

व्हिटॅमिन सीयुक्तआहार घ्यावा

विविध प्रकारच्या बेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे कोलेजनचे उत्पादन वाढवण्याचे काम करते. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले अँटिऑक्सिडंट्स देखी त्वचेसाठी चांगले असतात.

(टिप : वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.