Glitter Nail Art Designs : घरच्या घरी करा ग्लिटर नेल आर्ट, या ट्रेंडी डिझाइन नक्की ट्राय करून बघा...

Beauty Tips : काही खास प्रसंगी त्यांना आपल्या नखांवर सुंदर असं डिझाईन हवं असतं. यासाठी तुम्ही नेल आर्ट करून घेऊ शकता.
Glitter Nail Art
Glitter Nail Artsakal
Updated on

काही वर्षांपुर्वी असं असायचं की नखांवर फक्त नेलपेंट लावलं तरी समाधान व्हायचं. कारण त्यामुळे नखांना अतिशय सुंदर लूक यायचा. पण आजच्या तरुण पिढीचं नुसतं नेलपेंट लावून मुळीच भागत नाही. काही खास प्रसंगी त्यांना आपल्या नखांवर सुंदर असं डिझाईन हवं असतं. यासाठी तुम्ही नेल आर्ट करून घेऊ शकता. चला तर मग ग्लिटर नेल आर्ट डिझाइन्स पाहुयात.

स्टार डिझाइन ग्लिटर नेल आर्ट

जर तुम्हाला ग्लिटर नेल आर्ट करायचे असेल, तर तुम्ही स्टार डिझाइन तयार करू शकता. या प्रकारच्या नेलं आर्टमुळे तुमचे हात खूप सुंदर दिसतील. यामध्ये काही नखांवर स्टार डिझाइन क्रिएट केले जाईल. उरलेल्या नखांवर सिंपल ग्लिटर नेल कलर लावला जाईल. यामुळे तुमचे नखं चांगले दिसतील.

Glitter Nail Art
Nail care : तुम्हालाही लांब नखं आवडतात? मग लिंबाचा असा करा वापर... नखं वाढण्यास होईल मदत

लीफ डिझाइन ग्लिटर नेल आर्ट

जर तुम्हाला हिरवा रंग आवडत असेल तर तुम्ही तुमच्या नखांवर त्या रंगाची नेल आर्ट डिझाइन करून घेऊ शकता. यामध्ये तुमच्या नखांवर पानांचे डिझाइन थ्रीडी स्टाइलमध्ये क्रिएट केले जाईल. ग्लिटर नेल कलर लावल्यानंतर हे सर्व क्रिएट केले होईल. तसेच त्यावर स्टोन लावा. यामुळे तुमचे नखं चांगले दिसतील. तुम्ही कोणत्याही नेल एक्स्टेंशन सलूनला भेट देऊन या प्रकारचे नेल आर्ट करून घेऊ शकता.

सिंपल ग्लिटर नेल आर्ट

जर तुम्हाला फॅन्सी नेल आर्ट करायचे नसेल तर तुम्ही सिंपल पद्धतीने ग्लिटर नेल आर्ट क्रिएट करू शकता. यामध्ये बेस सिंपल ठेवा. यानंतर ग्लिटर कोटिंग करा. मग तुमच्या आवडीचा ग्लिटर निवडा आणि तुमच्या नखांवर तुम्हाला हवी असलेली कोणतीही डिझाइन क्रिएट करा. यानंतर बोटांवर जेल नेल पेंट लावा. यामुळे तुमचे नखं चांगले दिसतील. याशिवाय हातही सुंदर दिसतील.

Related Stories

No stories found.