Keratin Treatment : हल्लीच्या धावपळीच्या काळात केसांची निगा राखायला कोणाकडे फारसा वेळ नसतो. पटापट आवरायचे आणि कामाला बाहेर पडायचे अशी अजकालची दिनश्चर्या झाली आहे. यात केसांना अमूक पॅक लावा किंवा हे लावून तासभर ठेवा यासाठी वेळ नसतो. पण प्रसंगानुसार तयार होताना केय हे सौंदर्यात भर घालणारा मोठा घटक असतो.
यासाठीच झटपट तयार होताना लूकही आकर्षक असावे हा क्रायटेरिया जपण्यासाठी केरेटीन ट्रिटमेंट हा उपाय प्रभावी आहे. या ट्रीटमेंटनंतर केस इतके रेशमी आणि मॅनेजेबल होतील की तुम्ही कंगवा केला नाही तरी ते सुंदर दिसतील.
काय आहे केरेटीन ट्रिटमेंट
केराटीन हेअर ट्रीटमेंट ही सेमी- परमनेंट हेयर स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट आहे. या केमिकल प्रक्रियेमुळे तुमचे केस मऊ, रेशमी आणि चमकदार बनतात.
काय करते
हे केस निरोगी बनवते, कुरळे केस ठीक करते आणि केसांची क्यूटिकल सील करते.
साईड इफेक्ट्स
उपचारादरम्यान जास्त प्रमाणात ब्लो ड्रायर किंवा फ्लॅट आयर्नचा वापर केल्यास केसांना नुकसान होऊ शकते.
प्रोफेशनल व्यक्तीकडूनच करा
केराटिन ट्रीटमेंट केवळ प्रोफेशनल व्यक्तीकडूनच केले पाहिजेत. उपचारापूर्वी तयारी आणि परिणामांबद्दल त्यांच्याशी बोला.
काळजी घ्या
तुम्ही फॉर्मल्डिहाइडला संवेदनशील नसल्याची खात्री करा. अन्यथा त्यामुळे नाक वाहणे, खाज सुटणे, डोळे, नाक आणि घशात जळजळ होऊ शकते.
शेम्पू किंवा तेल टाळा
उपचार करण्यापूर्वी दोन दिवस हेव्ही शॅम्पू किंवा तेल वापरणे टाळा.
किती वेळ लागतो
तुमच्या केसांचा प्रकार, लांबी आणि जाडी यावर अवलंबून केराटिन केसांच्या उपचारांना 1 ते 2 तास लागू शकतात.
कंगवा न करता ही केस सुंदर दिसतील
या ट्रीटमेंटनंतर केस इतके रेशमी आणि मॅनेजेबल होतील की तुम्ही कंगवा केला नाही तरी ते सुंदर दिसतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.