पुणे : ती सुंदर आहे पण तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर असलेलं चामखिळ तिच्यी सौंदर्यात बाधा ठरत आहे, अशी चर्चा अनेकदा तूम्ही ऐकली असेल. ज्यादातर रंग उजळ असणाऱ्या चेहऱ्यावरच चामखिळ घर करतात. यावर अनेक उपाय केले जातात. पण, चामखिळ काही हटत नाही. बरेचदा चामखीळ आपण खाजवतो, त्याला सतत हात लावतो, यामुळे ते अधिकच पसरते.
चामखीळ येण्याचे एकमेव महत्त्वाचे म्हणजे ह्यूमन पॅपोलोमा व्हायरस (Human Papillomavirus). अनेकांना चेहरा, मान, हात, पाठ, पाय यावर चामखीळ येऊ शकतात. पण खाजवल्यामुळे ज्यामुळे त्यातील व्हायरस शरीराच्या इतर भागामध्येही पसरतो आणि मग शरीरावरील चामखीळ वाढते. त्यामुळेच चामखिळवर घरगुती उपाय काय आहेत हे पाहुयात.
लसूण पेस्ट
चेहऱ्यावरील चामखीळ काढण्यासाठी तुम्ही लसूण पेस्ट वापरू शकता. यातून नक्कीच फायदा होतो. लसूण सोलून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चामखीळावर लावा आणि पट्टी लावा. आता २ ते ३ तासांनी ही पट्टी काढून टाका. आठवड्यातून 3 ते 4 वेळा या पेस्टचा वापर केल्याने चामखिळ समुळ नष्ट होऊ शकते.
एलोवेरा जेल
चामखीळांची समस्या दूर करण्यासाठी एलोवेरा जेल खूप फायदेशीर आहे. रोज कोरफडीचे जेल चामखीळावर लावा. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म चामखीळ काढण्यास मदत करतात.
एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा
चामखिळ काढून टाकण्यासाठी एरंडेल तेल आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण वापरले जाते. 2 चिमूट बेकिंग सोड्यात एरंडेल तेल घालून मिक्स करा. आता ही घट्ट पेस्ट चामखीळ भागावर लावा. त्यावर एक पट्टी लावा. सकाळी ही पट्टी काढल्यावर त्वचा स्वच्छ होईल.
अननस बटाटा रस
बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखिळावर लावल्याने हळूहळू कमी होण्यास मदत होते.तसेच, चामखिळपासून सुटका मिळण्यासाठी अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. हे रस नियमीत वापरल्यास चामखिळ गळून पडू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.