Hair Growth Tips : घरच्या घरी तयार करा हे आयुर्वेदिक तेल, हेअरफॉल कमी होऊन कमरेपर्यंत लांबसडक होतील केस

केसगळतीच्या समस्येमुळे त्रासलेले आहात का? यापासून मुक्तता मिळवण्यासाठी तयार करा आयुर्वेदिक तेल
Hair Growth Tips In Marathi
Hair Growth Tips In MarathiSakal
Updated on

पौष्टिक आहाराचा अभाव आणि खराब लाइफस्टाइल यामुळे बहुतांश जण केसगळतीच्या समस्येमुळे कंटाळलेले आहेत. पण नियमित योग्य पद्धतीने हेअर केअर रूटीन फॉलो केल्यास केसांशी संबंधित समस्या कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. केसांची चांगली वाढ व्हावी (Hair Care Tips In Marathi), कोंडा होऊ नये, केस कोरडे होऊ नयेत; अशी इच्छा असेल तर आतापासून केसांचा निगा राखायला सुरुवात करा. 

यासाठी बाजारातील महागड्या प्रोडक्टवर खर्च करण्याऐवजी घरच्या घरी रामबाण आयुर्वेदिक तेल तयार करा आणि केसांसाठी त्याचा वापर करा. या तेलाचा वापर केल्यास केसांना नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चराइझल मिळेल आणि केसगळतीची (Hair Growth Tips In Marathi) समस्याही दूर होईल. कसे तयार करायचे हे आयुर्वेदिक तेल जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Hair Growth Tips In Marathi
Hair Care Tips : केसांची वाढ खुटलीय, केस गळतायतंय तर आम्ही सांगितलेला हा उपाय करा फरक अनुभवा!

तेल तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री

  • नारळाचे तेल - एक कप

  • कढीपत्त्याची पाने - मूठभर

  • आवळा पावडर - एक चमचा

  • मेथीची दाणे - एक चमचा

  • काळे तीळ - एक चमचा

  • कोरफडीचे एक ताजे पान

Hair Growth Tips In Marathi
Curly Hair Care Tips : कुरळ्या केसांची अशी काळजी घ्याल तर कसे होतील चमकदार, घनदाट व काळेभोर

आयुर्वेदिक तेल कसे तयार करावे ?

  • गॅसच्या मंद आचेवर एक पॅन ठेवा. पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करत ठेवावे.

  • त्यामध्ये एक चमचा आवळा पावडर मिक्स करा.

  • यानंतर एक मूठभर कढीपत्त्याची पानेही मिक्स करा. 

  • मग मेथीची दाने, कोरफडीचा गर, काळे तीळ देखील मिक्स करा.

  • वरील सर्व सामग्री एक तासभर डबल बॉयलिंग पद्धतीने गरम करावी. 

  • पण गॅस मंद आचेवरच राहील, याची काळजी घ्यावी. 

  • तेल तयार झाल्यानंतर ते गाळणीने एका बरणीमध्ये गाळून घ्या आणि नीट स्टोअर करून ठेवा. 

Hair Growth Tips In Marathi
Hair Coloring Tips: हेअर कलर करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, केस होणार नाही खराब

डबल बॉयलिंग पद्धत म्हणजे काय?

डबल बॉयलिंग पद्धत म्हणजे एखादा पदार्थ किंवा तेल-लेप थेट गॅसवर एखाद्या भांड्यामध्ये गरम न करता, त्याऐवजी एका पातेल्यात आणखी एक भांडे ठेवून त्यामध्ये पदार्थ शिजवावा. उदाहरणार्थ आपण उकडीचे मोदक ज्या प्रमाणे शिजवतो, अगदी तशी पद्धत. यामुळे सामग्री करपून खराब होण्याची शक्यता फार कमी असते.

Content Credit @kirtitewani (Instagram) 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.