Hair Care Tips हेअर डायऐवजी वापरा हळदीचे पॅक, केसांना मिळेल नॅचरल काळा रंग

तुम्ही देखील केसांसाठी केमिकलयुक्त हेअरडायचा वापर करत आहात का? तर मग वेळीच व्हा सावध
Natural hair dye at home
Natural hair dye at homeSakal
Updated on

Hair Care Tips : काळेभोर, सुंदर केस सर्वांनाच हवे असतात. पण प्रदूषण, पोषणतत्त्वांची कमतरता, खराब लाइफस्टाइल आणि अयोग्य हेअर केअर प्रोडक्ट्सच्या वापरामुळे केसांचा पोत खराब होऊ लागतो. परिणामी अकाली केस पांढरे होण्याचीही समस्या निर्माण होते. बरेच जण केस काळे करण्यासाठी कित्येक प्रकारच्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. 

पण बहुतांश प्रोडक्ट्समध्ये केमिकल असते. यामुळेही केस पांढरे होतात आणि केसांशी संबंधित अन्य समस्याही उद्भवतात. या समस्या टाळण्यासाठी आपण हेअर केअर रूटीनमध्ये नैसर्गिक उपचारांचा समावेश करून पाहा. उदाहरणार्थ हळदीचे हेअर पॅक ज्यामुळे केसांना नैसर्गिक स्वरुपात काळा रंग मिळू शकतो. कसे तयार करायचे हळदीचे हेअर पॅक जाणून घेऊया सविस्तर माहिती….

Natural hair dye at home
Homemade Protein Hair Mask: चमकदार व लांबसडक केस पाहिजेत? मग घरी बनवा प्रोटीन हेअर मास्क

हळद आणि मध हेअर पॅक

सामग्री 

  • हळद - एक चमचा

  • मध - दोन चमचे

  • ऑलिव्ह ऑइल - एक चमचा 

Natural hair dye at home
Mehndi For Hair: मेहंदीत या गोष्टी मिक्स करुन लावा, केस होतील काळेभोर

एका वाटीमध्ये वरील सर्व सामग्री एकत्रित मिक्स करा. हे मिश्रण मुळांसह संपूर्ण केसांवर लावावे. १५ ते २० मिनिटांसाठी हे पॅक केसांवर लावून द्यावे. यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्यावे. या हेअर पॅकमुळे केस मऊ आणि सुंदर देखील होतात.

Natural hair dye at home
Curly Hair Care Tips : कुरळ्या केसांची अशी काळजी घ्याल तर कसे होतील चमकदार, घनदाट व काळेभोर

हळद आणि कोरफड 

हळद आणि कोरफडीच्या गराचे हेअर पॅक केसांवर लावल्यासही केसांना नैसर्गिक काळा रंग प्राप्त होऊ शकतो. 

सामग्री 

  • हळद - एक चमचा

  • पाणी - एक कप

  • कोरफडीचा गर - एक चमचा

वरील सर्व मिश्रण एकत्रित करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण मुळांसह संपूर्ण केसांवर लावा. तासाभर हे मिश्रण केसांवर लावून ठेवावे. यांनतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. या मिश्रणामुळे केस चमकदार आणि सुंदर होतात. 

हळद आणि नारळाचे तेल 

सामग्री 

  • नारळाचे तेल - तीन ते चार चमचे

  • हळद - एक चमचा

नारळाच्या तेलात हळद मिक्स करा आणि तेल हलकेसे गरम करून घ्या. आता हे तेल मुळांसह केसांना लावा व हलक्या हाताने केसांचा मसाज करा.  २० मिनिटांनंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. या मिश्रणामुळे केसांची चांगली वाढ देखील होते. 

NOTE हे उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. अ‍ॅलर्जी किंवा त्वचा लाल झाल्यास किंवा त्वचेवर जळजळ होत असल्यास हे उपाय करणं टाळावे. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.