Beauty Care Tips In Marathi : चेहऱ्याच्या त्वचेची निगा राखण्यासाठी नैसर्गिक औषधोपचारांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. कारण यामुळे त्वचेचा पोत खराब होत नाही, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्वचा नैसर्गिक पद्धतीने एक्सफॉलिएट करण्यासाठी उटण्याचा वापर करणे हा एक सर्वोत्तम उपाय मानला जातो.
उटण्यामध्ये नैसर्गिक घटक उदाहरणार्थ हळद, केशर आणि बेसन यासारख्या गोष्टींचा समावेश केला जातो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत मिळू शकते. सोबतच त्वचेवर जमा झालेली घाण, अतिरिक्त तेल इत्यादी समस्या दूर होण्यासही मदत मिळते.
चेहऱ्यावरील मुरुमांची (Pimples Home Remedies In Marathi) समस्याही कमी होते. महत्त्वाचे म्हणजे त्वचा एक्सफॉलिएट करण्याचा हा रामबाण उपाय आहे. जाणून घेऊया घरच्या घरी उटणे (how to make ubtan at home) कसे तयार करायचे.
बेसन - दोन मोठे चमचे
हळद - अर्धा चमचा
दुधामध्ये भिजवलेली चिमूटभर केशर
मध - एक चमचा
गुलाब पाणी
उटणे चेहऱ्यावर लावण्यापूर्वी सर्वप्रथम चेहरा व मानेचा भाग स्वच्छ धुऊन घ्यावा. यानंतर चेहरा व मानेवर उटणे लावा व गोलाकार दिशेमध्ये हलक्या हाताने चेहरा व मानेचा मसाज करावा. जवळपास १५ ते २० मिनिटे उटणे चेहऱ्यावर लावून ठेवावे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो यावा याकरिता आठवड्यातून तिनदा हा उपाय करू शकता.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.