Face Beauty Tips: सनबर्न आणि टॅनिंग दूर करण्यासाठी महागडे Facial कशाला? या ५ उपायांनी उजळेल चेहरा

Natural remedies to remove sun tan: रोजच्या वापरातील काही घरगुची वस्तूंच्या मदतीने सनबर्न आणि टॅनिंगमुळे खराब झालेली त्वचा पुन्हा चांगली करणं शक्य आहे. या उपायांनी तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या नाहीश्या होतील.
Face Beauty Tips
Face Beauty TipsEsakal
Updated on

Face Beauty Tips: उन्हाळ्याचा पारा दिवसेंदिवस वर चढत चालला आहे. याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होत आहे. उन्हामुळे Sunlight सनबर्न, त्वचा ड्राय होणं आणि जळजळ अशा अनेक समस्या निर्माण होतात.

त्वचेच्या Skin चिंतेमुळे उन्हात पाऊल ठाकणंही अनेकांना कठिण होतं. त्यात उन्हामुळे चेहरा काळवंडण्याच्या समस्येलाही तोंड द्यावं लागत. त्यामुळे या काळात त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. Beauty Tips Marathi Home products for facial to avoid tanning

उन्हाळ्यात Summer प्रखर सुर्य प्रकाशामुळे चेहरा काळवंडतो. तसचं पुर, मुरुम आणि सनबर्नमुळे चेहऱ्याचं सौदर्य कमी होतं.

उन्हाळ्यात चेहरा चांगला रहावा म्हणून अनेक प्राॅडक्ट खरेदी करतात किंवा अनेकजण पार्लरमध्ये जाऊन फेशियल Facial किंवा डिटॅन ट्रीटमेंट करतात.

अर्थात यामुळे खिशाला मोठी कात्री लागते. त्याएवजी जर घरच्या घरीचं तुम्ही काही उपाय केलेत तर सनबर्न Sunburn आणि टॅनिंगची समस्या टाळता येणं शक्य आहे. 

रोजच्या वापरातील काही घरगुची वस्तूंच्या मदतीने सनबर्न आणि टॅनिंगमुळे खराब झालेली त्वचा पुन्हा चांगली करणं शक्य आहे. या उपायांनी तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या नाहीश्या होतील. चेहरा उजळून फ्रेश दिसू लागेल. पाहुयात काही घरगुती उपाय. 

लिंबू आणि मध- लिंबू आणि मधातील काही गुणांमुळे उन्हाळ्यात चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करणं शक्य आहे. यासाठी एका बाऊलमध्ये एका लिंबाचा रस आणि चमचाभर मध मिसळून पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट टॅनिंग असलेल्या त्वचेवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

लिबू आणि मधाच्या या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग तर कमी होईलच शिवाय तुमची त्वचा उजळून त्वचेला ग्लो येण्यास मदत होईल. 

टोमॅटो- टोमॅटोमध्ये आढळणारे लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट डेड स्किन दूर करण्याचं काम करतात. यासाठी टोमॅटोच्या स्लाइसने चेहरा आणि गळ्याचा भाग चांगला स्क्रब करा. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करा. 

टोमॅटोमुळे चेहऱ्याची टॅनिंग कमी होवून चेहरा उजळेल. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

Face Beauty Tips
Home facial: घरच्या घरी करा 'हे' असे 4 प्रकारचे नॅचरल फेशियल

मुलतानी माती- टॅनिंग दूर करण्यासाठी मुलतानी माती हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. मुलतानी माती लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा देखील मिळेल.

तसचं यातील हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील. यातील सक्रिय घटक अतिरिक्त तेल, घाण, घाम आणि अशुद्धता शोषून घेतात आणि त्वचा स्वच्छ, मऊ आणि कोमल राहते. Multani mati benefits in Marathi

मुलतानी मातीमध्ये दोन चमचे दूध आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटं राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

मुलतानी मातीमुळे सनबर्न किंवा टॅनिंगमुळे त्वचेचं झालेलं नुकसान भरुन निघण्यास मदत होईल. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतील आणि चेहरा तरुण दिसू लागेल. 

कोरफड- कोरफडीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. तसचं ती केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. कोरफड त्वचेवर सनस्क्रिन प्रमाणे काम करते. चेहऱ्याला कोरफड लावल्याने सनबर्न तसचं टॅनिंगची समस्या दूर होते. 

तुम्ही नुसत्या कोरफडीचा गरही चेहऱ्याला लावू शकता. किंवा एका बाऊलमध्ये कोरफडचा गर किंवा जेल घेऊन त्यात थोडं लवेंडर तेल मिसळा. हे मिश्रण २० मिनिटांसाठी चेहऱ्याला लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

बेसन आणि हळद- बेसन आणि हळद हा चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. यासाठी दोन चमचे बेसनामध्ये चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. तयार फेसपॅक चेहऱ्याला लावा. २० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. 

आठवड्यातून २-३ वेळा हा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग लगेचचं दूर होईल. याशिवाय चेहरा उजळून तरुण दिसू लागेल. 

अशा प्रकारे पार्लरमध्ये जाऊन कोणत्याही महागड्या ट्रिटमेंट न घेता घरच्या घरीच तुम्ही उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले टॅनिंग दूर करू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.