Nail Care: तुमची नखंही लगेचच तुटतात? लांब आणि मजबुत नखांसाठी करा हे उपाय

अनेकदा नखांना पुरेसं पोषण न मिळाल्याने त्यांची योग्य वाढ होत नाही. तर काही वेळेस हार्मोनल संतुलन बिघडल्याने देखील त्याचा परिणाम नखांवर होतो. अशात नखं मजबुत ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहुयात
नखंही हवीत हेल्दी
नखंही हवीत हेल्दीEsakal
Updated on

महिलांना चांगले कपडे परिधान करणं आणि मेकअप करुन सौदर्यात भर घालण्याची आवड असते. त्याचप्रमाणे आपली नखं Nails सुंदर आणि लांब सडक असावी असं देखील प्रत्येकीला वाटतं. Beauty Tips Marathi How to take care of your nails

लांब नखांवर एखादी सुंदर नेलपेंट Nail paint लावला की हाताचं सौंदर्य खुलुन येतं. यासाठी अनेक महिला आणि तरुणी नखं Nails वाढवतात. मात्र अनेकदा नख चांगली वाढण्याआधीच ती वारंवार तुटतात. अनेक महिलांची नख ही पातळ किंवा कुमकुवत असल्याने ती पूर्ण वाढण्याआधीच तुटतात. तर काहींच्या नखांची वाढ ही खूप कमी असते.

अशात सुंदर नख ठेवण्याची इच्छा असूनही ती पूर्ण होत नाही. मात्र काही घरगुती उपायांच्या मदतीने नखांना बळकट करणं तसंच नखांच्या वाढीसाठी प्रयत्न करणं शक्य आहे.

अनेकदा नखांना पुरेसं पोषण न मिळाल्याने त्यांची योग्य वाढ होत नाही. तर काही वेळेस हार्मोनल संतुलन बिघडल्याने देखील त्याचा परिणाम नखांवर होतो. अशात नखं मजबुत ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहुयात.

लसूण वापरून होतील नखं स्ट्राँग- नखं मजबूत करण्यासाठी एक लसणाची पाकळी घ्या. ही पाकळी सोलून ती मधून कापा. आता या लसणाच्या पाकळीने नखांना चांगलं ५ मिनिटांसाठी मसाल करा. लसणाचा रस नखांवर १५ मिनिटांसाठी तसाच राहू द्या.

त्यानंतर पाण्याने हात आणि नखं स्वच्छ धुवा. १० दिवस नियमित हा उपाय केल्याने तुमची नख मजबूत होवून ती तुटणार नाहीत.

हे देखिल वाचा-

नखंही हवीत हेल्दी
Nail Cutter : नेलकटरमध्ये दोन छोट्या सुऱ्या का असतात?

लिंबू किंवा संत्र्याचा रस- नखांच्या वाढीसाठी विटामिन सी गरजेचं असतं. यासाठीच तुम्ही लिंबाचा किंवा संत्र्याचा वापर करू शकता. यासाठी लिंबाची एक फोड घेऊन नखं मसाज करा. ५ मिनिटांनी हात स्वच्छ धुवा. यामुळे नख मजबुत होण्यासोबतच स्वच्छ देखील राहतील.

तसंच संत्र्याच्या रसामध्ये कोलेजन आढळतं. जे नखांच्या वाढीसाठी उपयुक्त असतं. यासाठी संत्र्याच्या रसाने नखांना मसाज करून हा रस १५-२० मिनिटांसाठी नखांवर राहू द्या त्यानंतर हात स्वच्छ धुवा.

नारळाचं तेल- नखांच्या वाढीसाठी नारळाचं तेल गुणकारी उपाय आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन ई मुळे नखांची वाढ होण्यास मदत होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल कोमट करून नखांना मसाज करा. यामुळे फरक जाणवेल.

ऑलिव्ह ऑईल- तुमची नखं कुमकवत असतील आणि सारखी तुटत असतील तर ऑलिव्ह ऑइल हा एक उत्तम पर्याय आहे. ऑलिव्ह आइल हे तुमच्या नखांच्या आतील भागापर्यंत जातं आणि नखांची वाढ होण्यास मदत होते. तसंच यामुळे रक्ताभिसरण सुधारल्याने नखं मजबुत राहतात.

यासाठी ऑइव्ह ऑइल थोडं कोमटं करून हलक्या हाताने नखांना आणि क्युचिकल्सला मसाज करा. तुम्ही रात्री मसाज करून हे तेल रात्रभर नखांवर ठेवू शकता.

हे देखिल वाचा-

नखंही हवीत हेल्दी
Eating Nails : नखं खाण्याची सवय पडू शकते महागात

अॅपल सायडर विनेगर- एक चमचा अॅपल सायडर विनेगरमध्ये एक लसणाची पाकळी किसून टाका. त्यानंतर हा रस नखांना १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने नखं धुवा.

जोजोबा ऑइल- नखांच्या वाढीसाठी गरजेचं असलेलं विटामिन ई आणि विटामिन बी कॉम्प्लेक्स जोजोबा ऑइलमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. तसंच या तेलात उपलब्ध असलेली खनिजं नखांच्या वाढीसाठी मदत करतात.

जोजोबा ऑइलने नखांना मसाज केल्यास नखं हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे नखं तुटत नाहीत. जोजोबा ऑइलच्या मसाजमुळे नखांमधील फंगल इंफेक्शनदेखील दूर होण्यास मदत होते.

अशा प्रकारे काही घरगुती उपाय करून तुम्ही नखांची काळजी घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.