Summer Skin Care: चेहऱ्याला लावा हा फ्रूट ज्यूस आणि पहा कमाल; २ आठवड्यात Wrinkles होतील गायब, चेहरा दिसेल तरुण

Best fruit for skin whitening: उन्हाचा तडाखा आणि घामामुळे त्वचेवरी अनेक परिणाम होतात. त्यामुळेच उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.तुम्हाला देखील अशात काही समस्यांचा Problems सामना करावा लागत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास उपाय घेऊन आलो आहोत
Best fruit for skin whitening
Best fruit for skin whiteningEsakal
Updated on

Best fruit for skin whitening: उन्हाचा तडाखा आणि घामामुळे त्वचेवरी अनेक परिणाम होतात. त्यामुळेच उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात त्वचेची Summer Skin Care योग्य काळजी न घेतल्यास त्वचेवर पुरळ येणं, ऍलर्जी, रॅश असा समस्या निर्माण होतात.

तसचं उन्हामुळे आणि डिहायड्रेशनमुळे त्वचा रुक्ष होते परिणामी त्वचेवर Skin वलकर सुरकुत्या येतात आणि चेहऱा कोमेजलेला दिसतो. Beauty Tips Marathi Watermelon Juice to solve skin problems

तुम्हाला देखील अशात काही समस्यांचा Problems सामना करावा लागत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास उपाय घेऊन आलो आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेलं एक फळ Fruit तुमच्या समस्या दूर करु शकतं. हे फळ म्हणजे कलिंगड Watermelon.

कलिंगडाच्या मदतीने तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होवू शकतात. तसचं चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो देखील येण्यास मदत होईल. कलिंगडमध्ये असलेलं अँटिऑक्सिडेंट, मिनरल्स आणि विटामिन्समुळे त्वचेला फायदा होतो.

उन्हाळ्यात सनबर्न Sunburn, एलर्जी अशा त्वचेशी संबंधित  अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या दूर करण्यासाठी कलिंगडाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो

१. कलिंगड ज्यूस दही फेसपॅक- यासाठी तुम्हाला दोन चमचे दही आणि ४-५ कलिंगडाचे तुकडे लागतील. सुरुवातीला कलिंगडाचा मिक्सरच्या मदतीने ज्यूस तयार करून घ्या.

त्यानंतर दही आणि कलिंगड ज्यूस एकत्र करून चांगलं फेटून घ्या. अशा प्रकारे तुमचा कलिंगड आणि दह्याचा फेसपॅक तयार होईल. Watermelon curd face pack 

हा फेसपॅक स्वच्छ चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती लावा. त्यानंतर १५ मिनिटं फेसपॅक चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. 

हे देखिल वाचा-

Best fruit for skin whitening
Natural Face Pack: घरच्या घरी तयार करा स्क्रब आणि पहा कमाल

२. टोमॅटो आणि कलिंगड- तेलकट त्वचेसाठी टोमॅटो आणि कलिंगड फेसपॅक चांगल रिझल्ट देतो. यासाठी टोमॅटो आणि कलिंगडाचा पल्प चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावावा आणि चेहरा धुवून टाकावा.

टोमॅटोमधील लाइकोपीन आणि कलिंगडमधील मॅलिक ऍसिड त्वचेसाठी नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्याचं काम करतं. यामुळे त्वचा स्वच्छ होते आणि पिंपल्सची समस्या कमी होते. तसचं चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. 

तुम्ही फक्त कलिंगडाचा ज्युस कापसाच्या बोळ्याने चेहऱ्याला लावू शकता.  हा ज्यूस चेहऱ्याला १० मिनिटं लावून ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्याची जळजळ कमी होवून चेहऱ्याला गारवा मिळेल. तसचं सुरकुत्या कमी होवून त्वचा तरुण दिसण्यास मदत होईल. Watermelon juice for skin 

कलिंगड ज्युसचे त्वचेसाठी फायदे- 

- कलिंगडामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीएजिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारिक रेषा कमी होतात.

- तसचं कलिंगडमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. यामुळे त्वचा मऊ राहते. 

- कलिंगडमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे पिंपल्सची समस्या दूर होते. तसचं चेहऱ्याला थंडावा मिळाल्याने पिंपल्सचा त्रास कमी होतो. 

- कलिंगडमध्ये विटामिन ए आणि सी आढळतं. यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते. तसचं सुरकुत्या कमी होतात.

हे देखिल वाचा-

Best fruit for skin whitening
Flour Face Pack : पिठाचा फेस पॅक असा बनवा घरच्या घरी, बघा कसा इस्टंट ग्लो येतो ते

- कलिंगडच्या रसामध्ये मॅलिक ऍसिड उपलब्ध असतं. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेवर चमक येते. Watermelon juice for glowing skin

- उन्हाळ्यात उन्हामुळे आलेली टॅनिंग घालवण्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरतो. 

- उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते. चेहऱ्यावर धूळ आणि घाण जमा होवून  पिंपल्स येऊ लागतात. अशा वेळी कलिंकडाच्या फेसपॅकने पिंपल्सची ही समस्या दूर करणं शक्य आहे.

-  कलिंगडाचा ज्यूस खास करून दह्यासोबत लावल्याने इंस्टंट ग्लो येण्यास मदत होते. 

अशा प्रकारे उन्हाळ्यात कलिंगड ज्यूस प्यायल्याने जसे आरोग्याला फायदे होतात. त्याचप्रमाणे या ज्यूसचा त्वचेसाठी वापर केल्यानेही त्वचा चमकदार आणि तरुण दिसण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()