Beauty Tips for Face : आईशप्पथ, कसली गोरी आहेस गं!, ऐकायचं असेल तर आताच फॉलो करा या टिप्स

Beauty tips for glowing skin : चेहऱ्यावर मुलतानी माती,मधाचे फेसपॅक लावा आणि चमत्कार बघा!
beauty tips for glowing skin
beauty tips for glowing skinesakal
Updated on

Beauty Tips : उन्हाळ्याचा झळा बसायला लागल्या आहेत. उन्हाचा सगळ्यात जास्त फटका आपल्या त्वचेला बसतो. अंगभर कपडे असले तरी चेहरा काळा पडतो. काळवंडलेला चेहरा घेऊन फिरणं आपल्याला अवघड होतं. त्यामुळे त्याला गोरं करण्यासाठी हजारो रूपये कधी पार्लर तर कधी आयुर्वेदीक दवाखान्यात खर्च होतात.

उन्हात फिरताना अनेकदा काळजी घेऊनही त्वचा टॅन होते. चेहऱ्यावर काळे स्पॉट दिसायला लागतात. अशावेळी काय करायचं हे कळत नाही. त्यावेळी काही घरगुती उपाय करून तुम्ही पुन्हा गोरं होऊ शकता. घरातील काही गोष्टांचा लेप लावणं, चेहऱ्याचा मसाज करणं असे काही उपायही कामी येऊ शकतात.

ऍपल साईड व्हिनेगर

काळवंडलेली त्वचा उजळण्यासाठी ऍपल साईड व्हिनेगर फायद्याचा ठरतो. यामध्ये असलेले गुणधर्म काळपट त्वचा उजळ करण्याचे काम करतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर एका बाऊलमध्ये चार चमचे व्हिनेगर घ्या. त्यामध्ये थोडे पाणी मिसळा. तयार लिक्विड चेहऱ्यावर जिथे काळे डाग आहेत तिथे लावा.

यामुळे टॅन झालेली त्वचा उजळते. चांगल्या रिझल्टसाठी काळे डाग पुर्णपणे निघून जाईपर्यंत हे वापरा. एखाद्या कार्यक्रमात चेहरा सुंदर दिसावा यासाठी हा प्रयोग करणार असाल तर दिवसातून तीनवेळा लावा. इतरवेळी दिवसातून एकदा रात्री झोपताना लावलं तरी चालेल.

चंदन पावडर

तुम्हाला इंस्टंट गोरेपणा हवा असेल. तर, चंदन पावडर लावणे कधीही फायद्याचे ठरते. चंदन पावडरमध्ये असलेले सुगंधी गुणधर्म चेहरा एकदम ताजा, टवटवीत करतील. चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही तीन दिवसातून एकदा हा प्रयोग करा.

एका बाऊलमध्ये चंदन पावडर आणि गुलाबजल एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावून अर्धा तास ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. तुमच्या चेहऱ्यात झालेला बदल तुम्हाला नक्कीच आनंद देईल.

चंदनाचा लेप बनवेल गोरं
चंदनाचा लेप बनवेल गोरंesakal
beauty tips for glowing skin
Face Care Tips: आलियासारखा चमकदार अन् टवटवीत चेहरा हवा असेल तर करा हा एक उपाय

मुलतानी माती

उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेड होत असतं. पाण्याच्या कमतरतेमुळे होतं. जशी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. तसं त्वचेलाही असते. त्यामुळे चेहरा तजेलदार राहतो. पण, पाणी कमी पडलं की त्वचा कोरडी पडते.

चेहऱ्याला मग खाज येणे, चेहरा तटतटणे असे प्रकार होतात. त्यावेळी मुलतानी माती तुमच्या कामी येते. मुलतानी माती आणि मध एकत्र करून चेहऱ्याला लावून घ्या. २० मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. तुमचा चेहरा मऊ आणि सुंदर झाला असेल.

कडिलिंब

उन्हाळ्यात कडिलिंबाच्या झाडाला पालवी फुटलेली असते. ती कोवळी पाने उकडून घ्या. त्याची बारीक पेस्ट करा. त्यामध्ये हळद, मध घालून ह मिश्रण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा ग्लो करेल आणि मुरूम, डाग यापासून सुटकाही होईल.

beauty tips for glowing skin
Skin Care : हे व्हिटॅमिन्स खुलवतील तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य

टोमॅटो

टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात, जे तुमच्या त्वचेचे टेक्स्चर सुधारण्यासाठी परिणामकारक ठरतात. त्यामुळे नॉर्मल त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमित त्वचेवर टोमटोचा गर लावू शकता. त्वचेवर त्वरित चमक मिळवण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय आहे.

कोरफडीचा गर

कोरफडीचा गर हे एक नैसर्गिक मॉश्चराईझर आहे. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ आणि तेलकटपणा कमी होतोच शिवाय त्वचा मऊ देखील होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा त्वचेला कोरफडीचा गर लावा. यासाठी कोरफडीचा गर चांगला मऊ करून घ्या. चेहऱ्यावर त्याचा फेसपॅक लावून वीस मिनीटांनी चेहरा थंड अथवा कोमट पाण्याने धुवून टाका.

त्वचा मऊ होण्यासाठी कोरफड उपयोगी
त्वचा मऊ होण्यासाठी कोरफड उपयोगीesakal
beauty tips for glowing skin
Face Care Routine : फेशिअल का आणि कधी करावे? पहा काय सांगतात एक्सपर्ट्स!

बेसन, हळद आणि गुलाबपाणी

तेलकट त्वचेवर बेसण, हळद आणि गुलाबपाणी फारच लाभदायक ठरू शकते. यासाठी एका वाटीत एक चमचा बेसण, चिमुटभर हळद आणि गुलाबपाणी घ्या. या मिश्रणाचा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

तेलकट त्वचेसाठी या फेसपॅकमध्ये दूध अथवा दही मिक्स करू नये. मात्र हा फेस पॅक इतर त्वचेच्या लोकांसाठी देखील उपयुक्त असल्याने इतरांनी त्यात गुलाबपाण्याऐवजी दूध, मध अथवा दही मिक्स करण्यास काहीच हरकत नाही.

केळं आणि मध

उन्हाळ्यात देखील तुमच्या त्वचेला मॉश्चराईझरची गरज असते. केळ आणि मध यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. यासाठी एक पिकलेले केळं व्यवस्थित स्मॅश करा यामध्ये एक चमचा मध घालून एक फेसपॅक तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावून वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका.

केळी आरोग्यासाठीच नाही तर चेहऱ्यालाही उपयुक्त
केळी आरोग्यासाठीच नाही तर चेहऱ्यालाही उपयुक्तesakal
beauty tips for glowing skin
Summer Skin Care Tips : उन्हामुळं चेहऱ्याचं तेज गेलंय? या सवयी देतील निखळ सौंदर्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()