सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. दिवाळीपूर्वी घरकाम आवरणे असो किंवा शॉपिंग यामुळे पार्लरला जायला महिलांना वेळच मिळत नाही. तुम्हाल जर पार्लरला जायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही घरीच फेसपॅक करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरीच पनीर फेसपॅक कसा करायचा, याविषयी सांगणार आहोत.
पनीर फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर काही तासातच ग्लो आणणार. या शिवाय हा फेसपॅक तुमची त्वचा आणखी चमकदार बनवेल. पनीर हा एक नॅचरल क्लींजर, मॉइश्चरायझर आणि टोनर म्हणून चेहऱ्यासाठी अधिक उपयुक्त आहे. ( paneer facepack )
चला तर जाणून घेऊया हा पनीर फेसपॅक कसा करायचा?
साहित्य -
पनीरचे तुकडे
मध
Vitamin E capsules
लिंबाचा रस
कृती
सुरवातीला पनीरचे तुकडे मिक्सरमधून काढून पेस्ट करावी
त्यात मध, लिंबाचा रस आणि Vitamin E capsules टाकावे. सर्व मिश्रण एकत्र करावे.
चेहरा स्वच्छ धुवावा आणि आणि कोरड्या कपड्याने पुसावा.
त्यानंतर तयार केलेले मिश्रण (फेसपॅक) चेहऱ्यावर लावावे. तुम्ही मानेवरही हा फेसपॅक वापरू शकता.
१५-२० मिनिटे तुम्ही फेसपॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा धुवा.
हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.