Beer Powder : मॅगीच्या धर्तीवर दोन मिनीटात तयार होणार थंडगार बिअर!

जर्मन संशोधकांची कमाल! बिअर बनवा आता दोनच मिनिटात
Beer Powder
Beer Powderesakal
Updated on

पार्टी असो किंवा काही स्पेशल प्रसंग लोक बिअर (Beer) घ्यायला विसरत नाहीत. काही लोकांच्या मनात हजारवेळा विचार येतो पण ती घेऊन कोण यायचं यामूळे बिअर टाळली जाते. काहींना ती आहे त्या जागेवर हवी असते. किंवा सगळा ग्रूप अचानक भेटल्यावर बिअरचे प्लॅनिंग झाले की ती आणायची कुठून हा प्रश्न असतो.

Beer Powder
Alcohol habit : दारूचं व्यसन लागंलय हे कसं ओळखावं; दारू सोडण्यासाठीचे काही सोपे उपाय!

अशा प्रसंगांचा विचार करूनच आता बिअरची पावडर (World’s First Beer Powder) बाजारात आली आहे. ज्यामूळे तूम्ही घरीच दोन मिनिटात बिअर बनवू शकणार आहात. जर्मनीने या बिअर पावडरची निर्मिती केली आहे. जी दोन चमचे पावडर थंड पाण्यात विरघळवून थंडगार बिअर तयार केली जाते.

Beer Powder
Alcohol Sale in Dubai : आता दारूचा परवाना मिळणार निःशुल्क; करातही केली वाढ

तूम्ही बिअरच्या बाटल्या सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही. ती स्टोअर करणेही तसे अवघडच आहे. त्यामूळे ही बिअर पावडर तूम्हाला मदत करेल. आजपर्यंत बिअर पावडर बनवता येईल आणि त्याने दोन मिनिटात बिअर तयार होईल, असे कोणी स्वप्नातही पाहिले नसेल. पण, हे सत्यात उतरवले आहे नोएटसेले ब्रुअरी यांनी.

Beer Powder
Air India alcohol Rules : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये किती दारू दिली जाते?

या शोधाबद्दल ब्रुअरी यांनी सांगितले की,  ही बिअर पावडर वर्षाच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होईल. बाटलीबंद बिअरच्या निर्यातीमध्ये जेवढे कार्बन उत्सर्जन होते तेवढे जास्त या पावडरमध्ये नसते. त्यामूळे तूम्ही कधीही ही पावडर विकत घेऊन ठेवू शकता.

Beer Powder
Alcohol Side Effects : दारुच्या या परिणामांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका

तुम्हाला हवे तेव्हा त्यापासून बिअर बनवू शकता. हि बिअर बनवण्यासाठी तूम्ही ग्लासमध्ये केवळ दोन चमचे ही पावडर टाका. आणि त्यात थंड पाणी मिक्स करा. तूमची बिअर तयार आहे.

Beer Powder
Alcohol Facts : दारू पिऊन इंग्लिश स्पीकिंग का सुरू होते ? या मागे सुद्धा आहे सायन्स

आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देत असाल की, बीअर पावडर भारतात कधी येणार आहे, तर तुम्हाला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, कारण भारतात प्रवेश करण्यासाठी अनेक कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल. सध्या ते फक्त जर्मनीमध्ये उपलब्ध आहे, ते संपूर्ण जगात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.