बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा नुकतीच विवाहबंधनात अडकली. तिच्या ब्रायडल लूकची आणि ब्रायडल मेकअपची भरपूर चर्चा झाली. ब्रायडल मेकअपपूर्वी तुमच्या त्वचेची काळजी घेणे आणि त्वचा आधीपासून मेंटेन ठेवणे हे अतिशय महत्वाचे आहे.
तुमची त्वचा जर फ्लॉलेस असेल तर दीर्घकाळ मेकअप त्वचेवर टिकवून ठेवण्याची क्षमता ही त्याप्रमाणे वाढते. त्यामुळे, लग्नापूर्वी त्वचेच्या समस्यांचे निराकारण करून त्वचेचे एक हेल्दी स्किनकेअर रूटीन बनवणे गरजेचे आहे. जर हे सर्व तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर ब्रायडल मेकअप करण्यापूर्वी तुमची त्वचा छान प्रकारे तयार होईल.
चला तर मग आज आपण ब्रायडल मेकअप करण्यापूर्वी स्किनकेअर रूटीन कसे असावे ? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.
ब्रायडल मेकअप करण्यापूर्वी अशा पद्धतीने स्किनकेअर रूटीन करा फॉलो
बऱ्याच तरूणींच्या बाबतीत असं होत की त्यांना त्यांची त्वचा कोणत्या प्रकारची आहे ? हेच माहित नसतं. त्यामुळे, तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा.
तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घ्या आणि त्या प्रमाणे स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा वापर करा.
रोज त्वचा स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यासाठी दिवसातून दोन वेळा चेहरा स्वच्छ धुवा.
चेहरा धुण्यासाठी तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉशचा वापर करा. शक्यतो जेंटल फेस वॉशचा वापर करा.
चेहऱ्यावर काळे डाग, अति तेलकटपणा, डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चेहऱ्याचे स्क्रबिंग अवश्य करा. यासाठी त्वचेला सूट होणारे स्क्रब वापरा.
चेहरा स्क्रब केल्याने मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते आणि त्वचेच्या इतर समस्या दूर होऊन त्वचा ग्लो करते. त्यामुळे आठवड्यातून किमान २ वेळा तरी फेस स्क्रब करा.
अनेक महिला फक्त उन्हाळ्यातच सनस्क्रिनचा वापर करतात. मात्र, असे करू नका. कोणताही ऋतू असुद्या रोज सनस्क्रिन लावा. बाहेर पडताना तर न विसरता लावा. सनस्क्रिन देखील तुमच्या त्वचेला सूट होणारे वापरा.
सनस्क्रिन लावल्यामुळे तुमच्या त्वचेचा सूर्याच्या तीव्र अतिनील किरणांपासून बचाव होतो. शिवाय, काळे डाग चेहऱ्यावर निर्माण होण्याचा धोका राहत नाही. त्यामुळे, सनस्क्रिन विथ SPF 30 किंवा त्यापेक्षा अधिक असलेले एसपीएफ त्वचेवर नियमितपणे लावा.
त्वचा हायड्रेटेड ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. त्वचा बाहेरून हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण टोनरचा वापर करतो. मात्र, त्वचा आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे.
त्यासोबतच, ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे, अशा फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. त्यामुळे, त्वचा संतुलित आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी फळे, भरपूर पाणी आणि त्वचेला सूट होणारे हायड्रेटेड टोनर वापरायला विसरू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.